IND vs WI 3rd ODI: गिल-किशनने वेस्ट इंडिजला झोडलं, तिसऱ्या वनडेत भारताचा मोठा विजय; मालिकाही जिंकली

IND vs WI 3rd ODI Highlight: या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्याची कसोटी मालिका 2-1 अशी खिशात घातली. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना विंडिजसमोर 352 धावांचं आव्हान ठेवलं होतं.
IND vs WI 3rd ODI Latest Cricket Updates
IND vs WI 3rd ODI Latest Cricket UpdatesSaam TV
Published On

IND vs WI 3rd ODI Latest Updates: इशान किशन आणि शुभमन गिलने रचलेला सलामीचा पाया, मधल्या फळीत संजू सॅमसन आणि हार्दिक पांड्याने केलेली शानदार खेळी आणि शार्दूल ठाकूरने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर टीम इंडियाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्या वेस्ट इंडिजवर तब्बल 200 धावांनी विजय मिळवला.

या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्याची वनडे मालिका 2-1 अशी खिशात घातली. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना विंडिजसमोर 352 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरूवात अत्यंत खराब झाली.

IND vs WI 3rd ODI Latest Cricket Updates
India vs Pakistan Match Date: ठरलं! तर 'या' दिवशी रंगणार भारत - पाकिस्तान सामन्याचा थरार; पाहा अपडेटेड वेळापत्रक

युवा गोलंदाज मुकेश कुमारने विंडिजच्या सलामीच्या दोन्ही फलंदाजांना झटपट माघारी पाठवलं. मुकेशने कायल मेयर्स 4 धावा, ब्रँडन किंग भोपळाही फोडू दिला नाही. त्यानंतर ठाकूर आणि कुलदीपने तळाच्या फलंदाजांना माघारी पाठवत संघाच्या विजयावर शिक्कामोक्तब केलं.

विंडिजचा संघ अवघ्या 151 धावांवर ऑल-आऊट झाला. लॉर्ड शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 4 तर मुकेश कुमार आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या.तत्पुर्वी नाणेफेक जिंकून टीम इंडियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.

फलंदाजीसाठी उतरलेले टीम इंडियाचे सलामीवीर शुबमन गिल आणि ईशान किशन यांनी 143 धावांची दमदार सलामी दिली. दोघांनीही सुरूवातीला सावध पवित्रा घेतला होता. मात्र, त्यानंतर दोघांनीही वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर आक्रमण केलं. किशनने 77 धावा केल्या.

मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. सलग तीन वन डे सामन्यांमध्ये किशनने तिसरं अर्धशतक ठोकलं. दुसरीकडे शुबमन गिल यानेही या सामन्यात 85 धावांची खेळी केली. अवघ्या 15 धावांनी त्याचं शतक राहून गेलं. अंतिम सामन्यामध्ये संधी मिळालेल्या रुतुराज गायकवाड अवघ्या 8 धावा करून परतला.

त्यानंतर संजू सॅमसन आणि हार्दिक पंड्या यांनी कमाल फलंदाजी केली. संजूने टी-20 स्टाईल पद्धतीने फलंदाजी केली 41 चेंडूत त्याने 51 धावांची खेळी केली. मिस्टर 360 डिग्री म्हणून ओळखला जाणार्या सूर्यकुमार यादवनेही 36 धावा केल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये पंड्याने हार्ड हिंटिंग करत टीम इंडियाला 350 धावांचा टप्पा गाठून दिला.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com