ishan kishan
ishan kishansaam tv

IND vs WI 3rd ODI: मालिका जिंकली, मालिकावीराचा पुरस्कारही पटकावला, तरीही ईशान किशन नाराज; सामन्यानंतर सांगितलं कारण

Ishan Kishan Statement: ईशान किशनला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला आहे. दरम्यान हा पुरस्कार मिळताच त्याने मोठे वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले आहे.
Published on

India vs West Indies: भारतीय संघाने तिसऱ्या वनडे सामन्यात विक्रमी विजय मिळवला आहे. या सामन्यात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने वेस्टइंडीज संघावर २०० धावांनी विजय मिळवला आहे.

यासह मालिका २-१ ने खिशात घातली आहे. भारतीय संघाने पहिल्या डावात ३५१ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात वेस्टइंडीजला अवघ्या १५१ धावा करता आल्या.

या सामन्यात अर्धशचक झळकावणाऱ्या ईशान किशनला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला आहे. दरम्यान हा पुरस्कार मिळताच त्याने मोठे वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले आहे.

ishan kishan
IND vs WI 3rd ODI: मैदानाबाहेर राहूनही विराटने जिंकवला सामना; विजयानंतर कॅप्टन पंड्याने केला खुलासा

ईशान किशनने या मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये अर्धशतकी खेळी केल्याचे पाहायला मिळाले आहे. याच कामगिरीच्या बळावर त्याला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला आहे. दरम्यान हा पुरस्कार मिळाल्यानंतर बोलताना तो म्हणाला की, 'ज्याप्रकारे माझ्या खेळीचा शेवट झाला त्याने मी नाराज झालो आहे. इतका खेळ खेळपट्टीवर टिकून राहिल्यानंतर मी मोठी खेळी करायला हवी होती. मला संघातील वरिष्ठ खेळाडूंनी देखील हेच सांगितलं होतं.' (Latest sports updates)

ishan kishan
IND vs WI 3rd ODI: गिल-किशनने वेस्ट इंडिजला झोडलं, तिसऱ्या वनडेत भारताचा मोठा विजय; मालिकाही जिंकली

भारतीय संघाने उभारला ३५१ धावांचा डोंगर..

या सामन्यात वेस्टइंडीज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने ५ गडी बाद ३५१ धावा केल्या होत्या.

भारतीय संघाकडून सलामीवीर फलंदाज शुबमन गिलने सर्वाधिक ८५ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ११ चौकार मारले. तर ईशान किशनने ७७ धावा केल्या. या खेळी दरम्यान ईशान किशनने ८ चौकार आणि ३ षटकार मारले.

तर आऊट ऑफ फॉर्म असलेला हार्दिक पंड्या देखील या सामन्यात फॉर्ममध्ये परतल्याचे पाहायला मिळाले आहे. तो नाबाद ५२ धावांची खेळी करत माघारी परतला.

या धावांचा पाठलाग करताना वेस्टइंडीज संघाचा डाव अवघ्या १५१ धावांवर संपुष्ठात आला. भारतीय संघाने ही मालिका २-१ ने आपल्या नावावर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com