Ind Vs SL ODI Series : रोहित शर्मा, विराट कोहली मालिकेचा तिसरा सामना खेळणार नाही? कारण...

टीम इंडियाने श्रीलंकेला टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत पराभूत केलं आहे. श्रीलंकेनंतर टीम इंडिया न्यूझीलँडविरुद्ध खेळणार आहे.
Rohit Sharma And Virat Kohli
Rohit Sharma And Virat Kohli Saam Tv
Published On

Ind Vs SL ODI Series : टीम इंडियाने श्रीलंकेला टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत पराभूत केलं आहे. श्रीलंकेनंतर टीम इंडिया न्यूझीलँडविरुद्ध खेळणार आहे. टीम इंडियाच्या श्रीलंकेविरुद्धचा एकदिवसीय मालिकेचा तिसरा सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्माला विश्रांती देण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तासात निर्णय होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

Rohit Sharma And Virat Kohli
Women Cricketer Death: धक्कादायक! महिला क्रिकेटपटूच्या संशयास्पद मृत्यूने क्रिडा जगतात खळबळ; कुटूंबियांचे गंभीर आरोप

रोहित शर्माने (Rohit Sharma) सांगितले होते की, ' माझ्यामध्ये टी२० क्रिकेट बाकी आहे. रोहित शर्माही टी-२० क्रिकेट फॉर्मेट खेळू इच्छितो'. या व्यतिरिक्त विराट कोहलीने (Virat Kohli) टी-२० फॉर्मेट चांगलं प्रदर्शन केलं. दोन्ही फलंदाजांनी आशिया कप आणि टी-२० फॉर्मेटमध्ये चांगलं प्रदर्शन केलं.

रोहित -विराटचं काय होणार ?

न्यूझीलँडच्या विरुद्ध टी-२० सामन्यांसाठी दोघांची निवड होणार, का याबद्दल चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. टीम इंडियाचे निवडकर्ते टी-२० विश्वचषकासाठी संघाची निवड करत आहे. रोहितलाही टी-२० विश्वचषक खेळण्याची इच्छा आहे .

रोहित-विराट एकदिवसीय सामने खेळणार

टीम इंडियाची न्यूझीलँडविरुद्ध एकदिवसीय मालिका होणार आहे. या मालिकेत विराट कोहली-रोहित शर्मा खेळणार आहे. दोन्ही दिग्गज फलंदाज टी-२० विश्वचषक खेळणं निश्चित आहे. न्यूझीलँडसाठी टीम इंडियाच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. टीम न्यूझीलँडचं नेतृत्व मिचेल सँटनर करणार आहे. तर केन विलियम्सनला विश्रांती देण्यात आली आहे.

Rohit Sharma And Virat Kohli
Virat Kohli Ishan Kishan Dance: आरारा कडकचं की! विराट- ईशान किशनचा डान्स बघून तुम्हीही असंच म्हणालं; Viral Video बघाच

भारत-न्यूझीलँड मालिकेचे वेळापत्रक

एकदिवसीय सामने :

पहिला सामना : १८ जानेवारी - हैदराबाद

दुसरा सामना - २१ जानेवारी, रायपूर

तिसरा सामना - २४ जानेवारी, इंदौर

टी-२० सामने

पहिला सामना - २७ जानेवारी, रांची

दुसरा सामना - २९ जानेवारी, लखनऊ

तिसरा सामना - १ फेब्रुवारी, अहमदाबाद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com