Women Cricketer Death: धक्कादायक! महिला क्रिकेटपटूच्या संशयास्पद मृत्यूने क्रिडा जगतात खळबळ; कुटूंबियांचे गंभीर आरोप

महिला खेळाडूचा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला. ज्यामुळे क्रिडा जगतात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात खेळाडूच्या कुटूंबियांनी ओडिसा क्रिकेट असोसिएशन आणि महिला संघाच्या प्रशिक्षकावर गंभीर आरोप केले आहेत.
Womens Cricket
Womens CricketSaam Tv
Published On

Odisa Women Cricketer Death: सध्या क्रिकेट जगताला मोठा धक्का देणारी बातमी समोर येत आहे. ओडिसा संघाच्या महिला क्रिकेटपटूचा (Womens Cricketer) संशयास्पद मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. राजश्री असे या महिला खेळाडूचे नाव असून तिचा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला. या बातमीने क्रिडा जगतात खळबळ माजली असून राजश्रीच्या आईने ओडिसा क्रिकेट असोसिएशन आणि तिच्या प्रशिक्षकांंवर गंभीर आरोप केले आहेत.

Womens Cricket
Viral Video: बाबो! कसलं ते धाडस! महिलेने थेट सिंहालाच उचलून घेतले, पुढे जे झालं ते.... पाहा व्हिडिओ

याबाबत अधिक माहिती अशी की, ओडिसाची २२ वर्षीय क्रिकेटपटू दोन दिवसांपासून बेपत्ता होती. याबद्दल ओडिसा क्रिकेट असोशिएशनच्या तक्रारीनुसार पोलिस तिचा शोध घेत असतानाच त्यांना तिची गाडी आणि हेल्मेटही मिळाले होते. पोलिसांच्या तपासात तिच्या मोबाईलच्या लोकेशनवरुन जंगलात तिचा शोध घेतला असता संशयास्पदरित्या मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला. ज्यामुळे या हत्येचे गुढ वाढले आहे.

ओडिसामधील वाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, राजश्री क्रिकेट प्रशिक्षण शिबिरात भाग घेतलेल्या 25 सदस्यीय संघाचा भाग होती, परंतु अंतिम संघात स्थान मिळवू न शकल्यामुळे ती तणावाखाली होती. त्यानंतर ११ जानेवारीपासून ती बेपत्ता होती.

Womens Cricket
Vikhe Patil News: सत्यजित तांबे भाजपमध्ये आल्याने भाजपची ताकद वाढेल असं नाही; राधाकृष्ण विखे पाटलांना असं का वाटतं?

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात राजश्रीच्या आईने ओडिसा (Odisa) क्रिकेट असोसिएशन आणि महिला संघाच्या प्रशिक्षकांवर गंभीर आरोप केले आहेत. ज्यामध्ये त्यांनी "राजश्री संघात निवड होण्यासाठी कटकला आली होती."

"यावेळी ती एका हॉटेलमध्ये राहत होती. मात्र १० दिवसांच्या प्रशिक्षणानंतर मुद्दाम तिला संघात स्थान देण्यात आले नाही. ती उत्तम खेळाडू असूनही तिला संघात स्थान देण्यात आले नव्हते ज्यामुळे ती तणावाखाली होती याबद्दल तिने बहिणीला फोनही केला होता," असा खुलासा केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com