India vs Sri Lanka: नवा कर्णधार अन् नव्या हेड कोचसह टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना! पाहा VIDEO
team indiatwitter

India vs Sri Lanka: नवा कर्णधार अन् नव्या हेड कोचसह टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना! पाहा VIDEO

IND vs SL: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघ श्रीलंकेला रवाना झाला आहे.
Published on

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये मर्यादीत षटकांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेला २७ जुलैपासून सुरुवात होणार आहे. दरम्यान या मालिकेसाठी भारतीय संघातील खेळाडू श्रीलंकेला जाण्यासाठी रवाना झाले आहेत. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील मालिका झाल्यानंतर सर्व खेळाडू आपल्या घरी परतले होते. दरम्यान ज्या खेळाडूंची श्रीलंका दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. ते खेळाडू मुंबईत एकत्र आले. सर्व खेळाडू आणि प्रशिक्षकांनी श्रीलंकेची वाट धरली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हार्दिक पंड्या सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक शर्माला मिठी मारताना दिसून येत आहे. यासह रिंकू सिंग, शुभमन गिल आणि टी- दिलीपही असल्याचं दिसून येत आहे.

India vs Sri Lanka: नवा कर्णधार अन् नव्या हेड कोचसह टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना! पाहा VIDEO
Team India Captain: ना हार्दिक,ना सूर्या; शुभमन गिल होणार भविष्यातील कर्णधार! ही आहेत प्रमुख कारणं

नवा कर्णधार, नवा मुख्य प्रशिक्षक

आयसीसी टी-२० वर्ल्डकप झाल्यानंतर राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला होता. त्यांच्याऐवजी गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. हा दौरा भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण,गौतम गंभीरची ही मुख्य प्रशिक्षक म्हणून पहिलीच मालिका असणार आहे. तर भारतीय संघ रोहित शर्मा आणि विराट कोहलीशिवाय खेळण्याासाठी मैदानात उतरणार आहे. आतापर्यंत रोहित शर्मा हा भारतीय संघाचा कर्णधार होता. तर पहिल्यांदाच भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसून येणार आहे.

India vs Sri Lanka: नवा कर्णधार अन् नव्या हेड कोचसह टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना! पाहा VIDEO
Gautam Gambhir Press Conference: 'विराट आणि माझं नातं..' हेड कोच बनताच गौतम गंभीरचा मोठा खुलासा

भारत- श्रीलंका मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. मालिकेतील पहिला सामना २७ जुलै रोजी रंगणार आहे. तर दुसरा सामना २८ आणि तिसरा सामना ३० जुलै रोजी रंगणार आहे. तर वनडे मालिका २, ४ आणि ७ जुलै रोजी रंगणार आहे.

श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे,अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवि बिश्नोई.

श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, केएल राहुल,शिवम दुबे, कुलदीप यादव, रिषभ पंत, श्रेयस अय्यर,खलील अहमद, हर्षित राणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com