Gautam Gambhir Press Conference: 'विराट आणि माझं नातं..' हेड कोच बनताच गौतम गंभीरचा मोठा खुलासा

Gautam Gambhir On Virat Kohli: भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने विराट कोहलीसोबतच असलेल्या नाते संबधाबाबत मोठा खुलासा केला आहे.
 Gautam Gambhir Press Conference: 'विराट आणि माझं नातं..' हेड कोच बनताच गौतम गंभीरचा मोठा खुलासा
gautam gambhir with virat kohlitwitter
Published On

भारतीय क्रिकेटच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. राहुल द्रविडनंतर भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत गौतम गंभीरने विराट कोहलीसोबत असलेल्या नात्याबाबत मोठा खुलासा केला आहे.

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि विराट कोहली एकत्र काम करताना दिसून येणार आहे. दरम्यान विराट कोहलीसोबत असलेल्या नात्याबाबत बोलताना गौतम गंभीर म्हणाला की, "विराट कोहली आणि माझं नातं खूप चांगलं आहे. आमच्यात चर्चाही होत असते. विराट जागतिक दर्जाचा खेळाडू आहे. हे उच्चस्तरीय खेळाडू आहे, हे मी अनेकदा सांगितले आहे. आम्ही दोघे मिळून मेहनत घेऊ आणि १४० कोटी जनतेचा अभिमान वाढवू.' असं गंभीर म्हणाला.

 Gautam Gambhir Press Conference: 'विराट आणि माझं नातं..' हेड कोच बनताच गौतम गंभीरचा मोठा खुलासा
Team India Captain: ना हार्दिक,ना सूर्या; शुभमन गिल होणार भविष्यातील कर्णधार! ही आहेत प्रमुख कारणं

आयपीएल स्पर्धेदरम्यान गौतम गंभीर आणि विराट कोहली अनेकदा भिडताना दिसून आले आहेत. २०१६ मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळत होता. त्यावेळी केकेआर विरुद्ध आरसीबी यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. त्यानंतर आयपीएल २०२३ स्पर्धेतही दोघं आमनेसामने आले होते.

 Gautam Gambhir Press Conference: 'विराट आणि माझं नातं..' हेड कोच बनताच गौतम गंभीरचा मोठा खुलासा
Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताकडून 117 खेळाडू उतरणार मैदानात! महाराष्ट्रातील किती खेळाडूंचा समावेश?

आयपीएल २०२३ स्पर्धेत गौतम गंभीर लखनऊ सुपर जायंट्स संघासाठी मार्गदर्शकाची भूमिका पार पाडत होता. त्यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान दोघेही आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे दोघांमध्ये नातेसंबंध चांगले नसल्याच्या चर्चा सुरु होत्या. दरम्यान आता गंभीरने या चर्चांणा पू्र्णविराम दिला आहे. दोघं मिळून भारतीय संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करतील गौतम गंभीरने म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com