Rohit Sharma, IPL 2025: रोहित शर्मा मुंबईची साथ सोडणार? या संघाकडून मोठी ऑफर

Rohit Sharma To Leave Mumbai Indians: आयपीएल २०२५ स्पर्धेपूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. दरम्यान या ऑक्शनमध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळू शकतात.
rohit sharma
rohit sharmayandex
Published On

आयपीएल २०२५ स्पर्धेपूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. त्यामुळे आपले खेळाडू दुसऱ्या संघाकडून खेळताना दिसून येऊ शकतात. मुंबई इंडियन्स संघाला ५ वेळेस आयपीएल चॅम्पियन्स बनवणारा रोहित शर्मा आगामी हंगामात दुसऱ्या संघाकडून खेळताना दिसू शकतो. आयपीएल २०२४ स्पर्धा सुरू असताना अशा चर्चा सुरू होती की, रोहित मुंबई इंडियन्स संघाची साथ सोडणार आहे. आता एका रिपोर्टमध्ये मोठा खुलासा करण्यात आला आहे.

rohit sharma
Ind vs SL : टीम इंडियाची निवड हरभजन सिंगच्या पचनी पडलीच नाही, ३ खेळाडूंची नावं घेत विचारला थेट सवाल!

आयपीएल २०२४ स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात मोठा फेरबदल पाहायला मिळाला होता. कर्णधार रोहित शर्माकडून नेतृत्वाची जबाबदारी काढून घेण्यात आली होती. ही जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आली होती. त्यामुळे असा अंदाज व्यक्त केला गेला होता की, रोहित मुंबईची साथ सोडू शकतो. दैनिक जागरणच्या रिपोर्टनुसार रोहित मुंबईची साथ सोडून आगामी हंगामात कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना दिसून येऊ शकतो. यासह सूर्यकुमार यादवबाबत देखील मोठी माहिती समोर येत आहे.

रोहित शर्माने २०१३ पासून मुंबई इंडियन्सची जबाबदारी खांद्यावर घेतली. तेव्हापासून ते २०२३ पर्यंत त्याने या संघाला ५ वेळेस चॅम्पियन बनवलं. मात्र २०२४ हंगाम सुरू होण्यापूर्वी त्याला अचानक कर्णधारपदावरून काढण्यात आलं आणि ही जबाबदारी हार्दिककडे सोपवण्यात आली. या निर्णयानंतर फॅन्स नाराजी व्यक्त करताना दिसून आले होते. दरम्यान काहींचं म्हणणं होतं की, रोहितला असं अचानक कर्णधारपदावरून काढणं चुकीचं होतं.

rohit sharma
Team India Captain: ना हार्दिक,ना सूर्या; शुभमन गिल होणार भविष्यातील कर्णधार! ही आहेत प्रमुख कारणं

रोहित शर्मा मुंबईची साथ सोडणार ही केवळ चर्चा आहे. याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे २०२५ च्या ऑक्शनमध्ये काय घडणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. काही वृत्तांमध्ये असाही दावा केला जात आहे की, रोहित शर्मा गुजरात टायटन्स संघाकडूनही खेळू शकतो. दरम्यान रोहित हा मुंबई इंडियन्स संघातील प्रमुख खेळाडू आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स त्याला सोडण्याची शक्यता खूप कमी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com