भारतीय संघाचा माजी खेळाडू पार्थिव पटेलने आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. या संघात एकापेक्षा एक स्टार होते. भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली गेली काही वर्ष या संघाचा कर्णधार होता. मात्र या संघाला एकदाही जेतेपदाला गवसणी घालता आली नाही. दरम्यान आता पार्थिव पटेलने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाबाबत मोठा खुलासा केला आहे.
पार्थिव पटेलने Cyruc Says Podcast च्या चर्चासत्रात सहभाग घेतला होता. या चर्चासत्रात त्याने त्यावेळचा किस्सा सांगितला ज्यावेळी तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळायचा. त्याचं असं म्हणणं आहे की, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात टीम कल्चर नव्हतं. हेच कारण आहे की, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ आजवर आयपीएलची एकही ट्रॉफी जिंकू शकलेला नाही.
पार्थिव पाटील म्हणाला की, 'मला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळण्याचा अनुभव आहे. या संघात व्यक्तीपुजा केली जाते. एक संघ म्हणून विचार केला जात नाही. ज्यावेळी मी संघात होतो त्यावेळी केवळ विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल यांचीच चर्चा होती. या संघात टीम कल्चर नाही. हेच कारण आहे की,रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ आयपीएलची ट्रॉफी जिंकू शकलेला नाही.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हा आयपीएल स्पर्धेतील सर्वात लोकप्रिय संघांपैकी एक आहे. आपला संघ जिंको किंवा पराभूत होवो, मात्र फॅन्सचा सपोर्ट कधीच कमी होत नाही. आयपीएलचे आतापर्यंत १७ हंगाम होऊन गेले आहेत. मात्र आजवर या संघाला एकही ट्रॉफी जिंकता आलेली नाही.
आयपीएल २०२४ स्पर्धेबद्दल बोलायचं झासं, तर या संघाला सुरुवातीच्या सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र त्यानंतर या संघाने सलग सामने जिंकून प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. मात्र एलिमिनेटरच्या सामन्यात या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या संघाने स्पर्धेतील फायनलमध्येही प्रवेश केला आहे. मात्र आयपीएलची ट्रॉफी जिंकता आलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.