Team India squad : कसोटी, वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; उपकर्णधार बदलला, कुणाला मिळाली संधी?

Team India Announces Test And ODI Squads Against Afghanistan : भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात म्हणजेच जूनमध्ये कसोटी आणि ३ सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघांमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
भारतीय कसोटी आणि वनडे संघाची घोषणा
Team India Test And ODI squadsaam tv
Published On

Team India announced For Test and One day Series : भारतात सध्या आयपीएलची धूम सुरू आहे. लीग स्टेजचे काही सामनेच शिल्लक आहेत. आयपीएल २०२६ चा अंतिम सामना ३१ मे रोजी खेळवला जाणार आहे. त्यानंतर भारतीय संघ जूनमध्ये कसोटी आणि वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात अनेक नवे चेहरे दिसणार आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळणार का, याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

भारतीय संघ जूनमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी आणि वनडे मालिका खेळणार आहे. दोन्ही संघांमध्ये एक कसोटी सामना आणि ३ वनडे सामने होणार आहेत. आयपीएलची धूम सुरू असतानाच, १९ मे रोजी गुवाहाटीत निवड समितीची बैठक झाली. त्यात कसोटी आणि वनडे मालिकेसाठी भारतीय संघ निवडण्यात आला. एक कसोटी सामना होणार असून, तो ६ जून रोजी मुल्लांपूरला सुरू होईल. त्यासाठी १४ सदस्य असलेल्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे २०१८ नंतर म्हणजेच आठ वर्षांनी भारताविरुद्ध अफगाणिस्तानचा पहिला कसोटी सामना असेल. २०१८ मध्येच अफगाणिस्तानने बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये पहिल्यांदाच अधिकृतरित्या कसोटी सामन्यात भाग घेतला होता. भारताने तो सामना एक डाव आणि २६२ धावांनी जिंकला होता.

विराट कोहली आणि रोहित शर्मा एकत्र खेळणार

अफगाणिस्तानविरुद्ध वनडे मालिकेसाठी १५ सदस्यांचा भारतीय संघ घोषित केला आहे. त्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन्ही दिग्गजांना स्थान देण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे भारताच्या वनडे संघातून ऋषभ पंतला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तर कसोटी संघाचं उपकर्णधारपद केएल राहुलकडे सोपवण्यात आले आहे. याआधी कसोटी संघाचं उपकर्णधारपद पंतकडे होते. पंतला कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. स्टार गोलंदाज मोहम्मद शमीला पुन्हा वगळण्यात आले आहे. निवड समितीने शमीच्या नावाची साधी चर्चा सुद्धा केली नाही, असे अजित आगरकरने स्पष्ट केले.

२ नव्या चेहऱ्यांना कसोटी आणि वनडेत संधी

भारताचा दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराह याला अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. इंग्लंड दौऱ्याआधी त्याचा वर्कलोड मॅनेज करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. तर कसोटी आणि वनडे मालिकेसाठी दोन नव्या चेहऱ्यांना संघात संधी दिली आहे. तर दोन्ही संघांमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना स्थान देण्यात आले आहे. त्यात मानव सुतार, हर्ष दुबे, गुरनूर बराड, प्रिन्स यादव यांचा समावेश आहे. मानवला कसोटी संघात पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. तर गुरनूर बराड आणि हर्ष दुबे या दोघांना दोन्ही संघात घेतले आहे. प्रिन्स यादवला वनडे संघात पहिल्यांदाच संधी मिळाली आहे.

अफगाणिस्तानच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक

  • ६ जून रोजी पहिला कसोटी सामना न्यू चंदीगड येथे सकाळी साडेनऊ वाजता होईल.

  • पहिला वनडे सामना १४ जून रोजी धर्मशाला येथे दुपारी दीड वाजता सुरू होईल.

  • १७ जून रोजी दुसरा वनडे सामना होईल. लखनऊच्या मैदानावर दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल.

  • २० जून रोजी तिसरा सामना चेन्नई येथे खेळवण्यात येणार आहे. हा सामना देखील दुपारी दीड वाजता सुरू होणार आहे.

भारतीय कसोटी आणि वनडे संघाची घोषणा
IPL 2026: १ जागा, ७ सामने अन् ५ संघ...कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकीट? CSK, KKR, RR अन् पंजाबला किती संधी?

भारतीय कसोटी संघ -

शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल (उपकर्णधार), साई सुदर्शन, ऋषभ पंत, देवदत्त पडिक्कल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मानव सुतार, गुरनूर बराड, हर्ष दुबे, ध्रुव जुरेल.

वनडे मालिकेसाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे -

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव, गुरनूर बराड, हर्ष दुबे.

भारतीय कसोटी आणि वनडे संघाची घोषणा
IPL 2026 : एकाच वेळी २ खेळाडू आयपीएलबाहेर; ५ वेळा चॅम्पियन ठरलेल्या संघाला दुहेरी झटका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com