T20 World Cup PAK vs SL Super 8: सामना जिंकूनही पाकिस्तान विश्वचषकात हरला; World Cupच्या स्पर्धेतून आऊट

Pakistan Out From 20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकातील सुपर ८ सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेचा ५ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २१३ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला फक्त २०७ धावा करता आल्या.
Pakistan players celebrate after defending 213 runs against Sri Lanka in the Super 8 clash, despite being eliminated from the tournament.
Pakistan players celebrate after defending 213 runs against Sri Lanka in the Super 8 clash, despite being eliminated from the tournament.
Published On
Summary
  • पाकिस्तानने श्रीलंकेवर ५ धावांनी रोमांचक विजय मिळवला.

  • २१३ धावांचे लक्ष्य श्रीलंकेसमोर ठेवले होते.

  • विजय मिळवूनही पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचू शकला नाही.

आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये शनिवारी श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात एक रोमांचक सामना झाला. हा सामना पाकिस्तानने ५ धावांनी जिंकला पण उपांत्य फेरीच्या शर्यतीतून आऊट झाला. या टी-२० विश्वचषकातील पाकिस्तानचा प्रवास आता संपला आहे. पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर गेल्यामुळे न्यूझीलंडला सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी मिळाली आरहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड हे संघ गट २ मधून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत.

या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. साहिबजादा फरहानच्या शतकाच्या जोरावर पाकिस्तानने श्रीलंकेसमोर २१३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु श्रीलंकेच्या संघाला मर्यादित धावसंख्येत रोखण्यात पाकिस्तानला अपयश आले. जर पाकिस्तानी गोलंदाजांनी श्रीलंकेला १४७ धावांवर रोखले असते तर पाकिस्तानने उपांत्य फेरी गाठली असती.

Pakistan players celebrate after defending 213 runs against Sri Lanka in the Super 8 clash, despite being eliminated from the tournament.
T20 World Cup: भारत-पाकिस्तान फायनलमध्ये भिडणार? 'या' एका समीकरणामुळे कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा आमनेसामने

कारण त्यांचा नेट रन रेट न्यूझीलंडपेक्षा चांगला राहिला असता. तर श्रीलंकेने १६ व्या षटकात १४७ धावांचा टप्पा ओलांडला. त्यानंतर शेवटच्या षटकात २८ धावांची गरज असताना श्रीलंकेचा संघ विजयाच्या जवळ पोहोचला. दरम्यान पाकिस्तानने हा सामना अवघ्या ५ धावांनी जिंकला. जो सामना त्यांना ६० धावांनी जिंकायचा होता, जेणेकरून ते उपांत्य फेरीत प्रवेश करू शकले असते.

Pakistan players celebrate after defending 213 runs against Sri Lanka in the Super 8 clash, despite being eliminated from the tournament.
Pakistan qualification chances: किवींचा पराभव पाकिस्तानच्या पथ्यावर; ६४ रन्स आणि १३.१ ओव्हर्सचं समीकरण नेमकं कसं?

श्रीलंकेची फलंदाजीची कामगिरी

२१३ धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना, श्रीलंकेची सुरुवात खराब झाली, त्यांनी नसीम शाहच्या दुसऱ्याच षटकात पथुम निस्सांकाला बाद केले. श्रीलंकेला ३३ धावांवर दुसरा धक्का बसला. त्यानंतर चारिथ असलंकाने चांगली फलंदाजी केली आणि आपली विकेट गमावण्यापूर्वी धावसंख्या ७५ पर्यंत नेली. त्यानंतर श्रीलंकेला ९४ धावांवर चौथा आणि १०१ धावांवर पाचवी विकेट गमावावी लागली.

पण त्यानंतर दासुन शनाका आणि पवन रथनायके यांच्यात एक शानदारी भागीदारी झाली. दोघांनी पाकिस्तानी गोलंदाजांना चांगलेच धारेवर धरले. पवनने शानदार अर्धशतक ठोकले. त्यासह १६ व्या षटकात जादुई १४७ धावांचा टप्पा ओलांडला. ३७ चेंडूत ५८ धावांची धमाकेदार खेळी केल्यानंतर पवनची विकेट १८ व्या षटकात पडली. पण त्यानंतर दासुन शनाकाने धमाकेदार खेळी केली. शेवटच्या षटकात श्रीलंकेला विजयासाठी २८ धावांची आवश्यकता होती. पण या धावा करण्यात लंकेच्या खेळाडूंना अपयश आले आणि पाकिस्तान ५ धावांनी सामना जिंकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com