Suryakumar Yadav Six: एकच मारला पण कडक मारला! जायडनच्या चेंडूवर सूर्याचा ट्रेडमार्क शॉट; VIDEO पाहायलाच हवा

IND vs WI 1st ODI: त्याने एक खणखणीत षटकार मारल्याचा ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
suryakumar yadav
suryakumar yadavsaam tv
Published On: 

IND vs WI 1st ODI Suryakumar Yadav Six: सूर्यकुमार यादव हा भारतीय संघातील आक्रमक फलंदाजांपैकी एक आहे. जेव्हा तो फलंदाजीला येतो त्यावेळी क्रिकेट चाहत्यांचं केवळ एंटरटेनमेन्ट, एंटरटेनमेन्ट आणि एंटरटेनमेन्टच होतं. वेस्टइंडीज विरुद्ध सुरु असलेल्या वनडे मालिकेत त्याला संधी दिली गेली आहे.

टी -२० मध्ये आपली छाप सोडणाऱ्या सूर्यकुमार यादवला वनडे क्रिकेटमध्ये आपली छाप सोडण्याची संधी दिली गेली आहे.

याचा फायदा घेत त्याने पहिल्याच सामन्यात १९ धावांची ताबडतोड खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने एक खणखणीत षटकार मारल्याचा ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

suryakumar yadav
IND vs WI: कुलदीप-जड्डूची जोडी चमकली! पहिल्याच सामन्यात 'या' मोठ्या विक्रमाला घातली गवसणी

तर झाले असे की, वेस्टइंडीज संघाकडून जायडन सील्स गोलंदाजी करण्यासाठी आला होता. सूर्याने जायडन सील्सच्या गोलंदाजीतील गतीचा आणि उसळीचा फायदा घेतला. त्याने समोरचा चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने ६ धावांसाठी मारला.

त्याचा हा शॉट पाहून गोलंदाज देखील आश्चर्यचकित झाल्याचे पाहायला मिळाले होते. सूर्यकुमारचा हा शॉट इतका परफेक्ट होता की, चेंडू बॅटला लागताच चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. तो चेंडू थेट कार पार्किंगमध्ये जाऊन पडला.

११ व्या षटकात झाला बाद..

सूर्यकुमार यादवचं तिसऱ्या क्रमांकावर प्रमोशन करण्यात आलं होतं. या संधीचा फायदा घेत तो मोठी खेळी करेल असं वाटलं होतं. मात्र त्याला मोठी खेळी करता आली नाही. त्याची खेळी १९ धावांवर संपुष्टात आली.

त्याने २५ चेंडूंचा सामना करत ३ चौकार आणि १ षटकारच्या मदतीने १९ धावांची खेळी केली. त्याने गुडाकेशच्या चेंडूवर स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा प्रयत्न फसला. कारण तो गुडाकेशच्या चेंडूवर पायचीत होऊन माघारी परतला. (Latest sports updates)

भारतीय संघाचा एकतर्फी विजय...

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय गोलंदाजांनी वेस्टइंडीज संघाचा डाव अवघ्या ११४ धावांवर रोखला. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून ईशान किशनने सर्वाधिक ५२ धावांची खेळी करत भारतीय संघाला ५ गडी राखून विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.