IND vs WI: कुलदीप-जड्डूची जोडी चमकली! पहिल्याच सामन्यात 'या' मोठ्या विक्रमाला घातली गवसणी

Kuldeep Yadav - Ravindra Jadeja Record: कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजाच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
kuldeep yadav with ravindra jadeja
kuldeep yadav with ravindra jadejasaam tv
Published On

IND vs WI 1st ODI: भारतीय संघाला यावर्षी वनडे वर्ल्डकप स्पर्धा खेळायची आहे. त्यामुळे येणारा प्रत्येक सामना हा भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. सध्या भारतीय संघ वेस्टइंडीज दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिला वनडे सामना बार्बाडोसच्या मैदानावर पार पडला.

या सामन्यात भारतीय संघाने ५ गडी राखून विजय मिळवला. दरम्यान या सामन्यात दमदार कामगिरी करणाऱ्या कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजाच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. (Kuldeep Yadav -Ravindra Jadeja Record)

kuldeep yadav with ravindra jadeja
IND vs WI: ..म्हणून रोहितने थेट बॅटिंग ऑर्डरच बदलली! सामन्यानंतर केला मोठा खुलासा

कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजाची जोडी वेस्टइंडीज संघावर भारी पडली. दोघांनी मिळून वेस्टइंडीजच्या ७ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली. कुलदीप यादवने या सामन्यात ४ तर रविंद्र जडेजाने ३ गडी बाद केले. यासह कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजाची जोडी अशी पहिलीच डाव्या - उजव्या हाताची जोडी ठरली आहे ज्यांनी एकाच सामन्यात मिळून ७ गडी बाद केले आहेत.

या सामन्यात रविंद्र जडेजाने ६ षटके गोलंदाजी केली. यादरम्यान त्याने ३७ धावा खर्च करत ३ गडी बाद केले. तर फलंदाजी करताना १६ धावांची महत्वपूर्ण खेळी देखील केली. तर कुलदीप यादवबद्दल बोलायचं झालं तर त्याने ३ षटके गोलंदाजी केली. यादरम्यान त्याने २ षटकात ६ धावा खर्च करत ४ गडी बाद केले. (Latest sports updates)

kuldeep yadav with ravindra jadeja
IND vs WI: कुलदीपची भन्नाट गोलंदाजी अन् ईशानच्या क्लास फलंदाजी समोर विंडीजचं सरेंडर; टीम इंडियाचा मोठा विजय

रविंद्र जडेजाने मोडला कपिल देवचा विक्रम...

रविंद्र जडेजाने कसोटी मालिकेत दमदार कामगिरी केली होती. हीच कामगिरी त्याने वनडे मालिकेतही सुरू ठेवली आहे. त्याने पहिल्याच वनडे सामन्यात ३ गडी बाद केले आहेत. यासह त्याने कपिल देव यांचा मोठा विक्रम मोडून काढला आहे.

त्याने कपिल देव यांचा वेस्टइंडीज विरुद्ध खेळताना वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम मोडून काढला आहे. आता जडेजा वेस्टइंडीज विरुद्ध खेळताना वनडेत सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला आहे.

त्याच्या नावे ४४ गडी बाद करण्याची नोंद आहे. तर दुसरीकडे कपिल देव यांनी ४३ गडी बाद केले होते. तर ४१ गडी बाद करणारे अनिल कुंबळे या यादीत तिसऱ्या स्थानी आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com