Suryakumar Yadav : माझ्या नावानं खोटं..., व्हायरल पोस्टवर सूर्यकुमार यादवची सणसणीत चपराक, सूर्यवंशीसाठी खास मेसेज

Suryakumar Yadav Statement : टीम इंडियातून वगळल्यानंतर सूर्यकुमार यादवचे वक्तव्य सोशल मीडियामध्ये प्रचंड व्हायरल झाल्यानंतर त्यावर सणसणीत उत्तर दिलं आहे. याशिवाय वैभव सूर्यवंशीला खास मेसेज दिला आहे.
सूर्यकुमार यादवची व्हायरल पोस्टनंतर सणसणीत चपराक, वैभव सूर्यवंशीसाठीही खास मेसेज
suryakumar yadav.social media
Published On

सूर्यकुमार यादव याला टी २० कर्णधारपदावरून हटवण्यात आलं आहे. आता भारतीय संघात देखील तो नाही. त्याच्याच नेतृत्वाखाली भारतानं टी २० वर्ल्डकप जिंकला होता. सूर्यकुमारला हटवल्यानंतर श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद सोपवलं आहे. सूर्यकुमार यादव भारतीय संघात नसला तरी, त्याच्या हृदयाच्या कप्प्यात संघासाठी विशेष स्थान आहे. सध्या सोशल मीडियावर त्याच्या नावानं पोस्ट व्हायरल होत आहे. त्यावरही त्यानं मौन सोडलं आहे.

कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या पोस्टवर विश्वास ठेवू नका, असे सूर्यकुमार यादवने म्हटले आहे. माझ्या नावावर खोटे पसरवले जात आहे, असे सांगतानाच त्याने युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीसाठी एक खास मेसेज दिला आहे. १५ वर्षीय वैभवने नुकतेच टीम इंडियासाठी पदार्पण केले आहे. यासह तो भारताकडून सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय संघात पदार्पण करणारा खेळाडू ठरला आहे.

भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. श्रेयस अय्यरकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. त्याच्या नेतृत्वात झालेल्या चारही सामन्यात एकही विजय मिळालेला नाही. आयर्लंडमध्ये तर दोन सामन्यांमध्ये पराभूत व्हावे लागले होते. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली संघाने विजयीरथ सुरूच ठेवला होता. मात्र, आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात विजय मिळणे कठीण झाले आहे. त्याच दरम्यान सूर्यकुमार यादवचे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावर त्याने मौन सोडले आहे.

सूर्यकुमार यादव याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. टीम इंडियासाठी खूपच आनंदित आहे. त्यांनी चांगला खेळ करावा असं कायमच मनापासून वाटत असतं. सर्व खेळाडू आपले सर्वोत्कृष्ट देत आहेत हे माहीत आहे. माझा कायम त्यांना पाठिंबा असेल, असे सूर्यकुमार म्हणाला.

सूर्यकुमारने वैभव सूर्यवंशीसाठी खास संदेश दिला आहे. तू करिअरच्या सर्वात रोमांचक प्रवासाला सुरुवात केली आहे. प्रत्येक क्षणाचा आनंद घे. देशाला अभिमान वाटेल असे कर, असे तो म्हणाला. सध्या एक वक्तव्य माझ्या नावाने सोशल मीडियावर पसरवले जात आहे. ते पूर्णपणे चुकीचे आहे. मी असे कोणतेही वक्तव्य केले नाही हे मी स्पष्ट करू इच्छितो. कृपया अशा कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवू नका आणि शेअरही करू नका, असे आवाहन त्याने केले आहे.

भारतीय क्रिकेट, माझे संघ सहकारी आणि खेळाप्रती माझा नेहमीच पाठिंबा राहील, असेही तो म्हणाला. सध्या सूर्याच्या नावाने अनेक वक्तव्ये सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, सूर्या नेमक्या कोणत्या वक्तव्याबद्दल बोलत आहे, हे स्पष्ट झालेले नाही. सूर्यकुमारला संघातून वगळण्यात आल्याचे सांगण्यात आले नाही, अशा पोस्ट अनेक पेजवर व्हायरल होत आहेत. मला माझ्या भविष्याबद्दल कोणतीही कल्पना दिली नाही याची माझ्या मनात नेहमीच सल राहील. वर्ल्डकप जिंकल्यानंतर मी कॅप्टन राहील असे सांगण्यात आले होते. पण माझे नाव संघात नाही, हे अखेरच्या क्षणी समजले. मी जे काही केलं त्यानंतर मला तितका मान मिळाला नाही जितका अपेक्षित होता. असं वाटतंय की माझी सगळी मेहनत विसरले. आता माझी त्यांना गरज नाही, अशा प्रकारचे वक्तव्य त्याच्या नावाने व्हायरल होत आहे.

सूर्यकुमार यादवची व्हायरल पोस्टनंतर सणसणीत चपराक, वैभव सूर्यवंशीसाठीही खास मेसेज
एकाच वेळी दोन मोठ्या घोषणा; इंग्लंडविरुद्ध वनडेआधीच टीम इंडियात बदल; झिम्बाब्वे दौऱ्यात 'चॅम्पियन'ला डच्चू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com