Suryakumar Yadav Love Story: कॅन्टीनमध्ये देविशाची एक झलक अन् पडली Mr 360 ची विकेट! वाचा सूर्याची रोमँटिक लव्हस्टोरी..

Suryakumar Yadav And Devisha Shetty Love Story: नेमंकी सूर्यकुमार यादवची लव्ह स्टोरी काय आहे. जाणून घेऊया.
suryakumar yadav with wife devisha
suryakumar yadav with wife devishasaam tv
Published On: 

Suryakumar Yadav: भारतीय संघाचा मिस्टर 360 म्हणून ओळखला जाणारा सूर्यकुमार यादव हा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. जेव्हा तो मैदानावर फलंदाजी करण्यासाठी येतो त्यावेळी गोलंदाजांना प्रश्न पडतो की, चेंडू नेमका टाकायचा तरी कुठे. कारण सूर्यकुमार यादव हा मैदानाच्या चारही बाजुंना फटकेबाजी करतो. त्याची फलंदाजी शैली जरा हटके आहे. फलंदाजी शैलीसह त्याची लव्हस्टोरी देखील हटके आहे.

सूर्यकुमार यादव हा 2016 मध्ये देविशा शेट्टी सोबत विवाह बंधनात अडकला होता. विवाह होण्यापूर्वी सूर्याने देविशाला 6 वर्ष डेटही केलं होतं. खरं तर, पाहता क्षणी तो देविशाच्या प्रेमात पडला होता. नेमंकी सूर्यकुमार यादवची लव्ह स्टोरी काय आहे. जाणून घेऊया.

suryakumar yadav with wife devisha
Asia Cup 2023: आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची प्लेइंग ११ जाहीर! माजी कर्णधाराला मिळू शकते मोठी जबाबदारी

एका मुलाखतीत बोलताना सूर्याने आपल्या एक रोमांचक किस्सा सांगितला आहे. याबाबत बोलताना तो म्हणाला की,'एकदा मी कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये मित्रासोबत बसलो होतो.कुणीतरी आवाज दिला म्हणून मी मागे पाहिलं. तितक्यात मला देविशा समोरून येताना दिसली. देविशा माझ्या मित्राच्या ओळखीतली होती. तिने माझ्या मित्राशी 5 ते 7 मिनिटे गप्पा मारल्या आणि तिथून निघून गेली.'

तसेच तो पुढे म्हणाला की,'माझी देविशाशी मैत्री व्हावी म्हणून मी मित्राकडे विणवण्या करू लागलो. पण मित्र म्हणाला,मामला थोडा कठीण आहे पण आपण प्रयत्न करून पाहु. त्यावेळी BBM पिन मोठ्या प्रमाणात वापरलं जायचं. मी देवीशाला सतत रिक्वेस्ट पाठवत होतो, मात्र देविशाकडून कोणताही रिसपॉन्स येत नव्हता..' (Latest sports updates)

फेसबुकच्या साहाय्याने झाली मैत्री...

तसेच तो पुढे म्हणाला की,'शेवटी मग मी फेसबुकचा आधार घेतला. देवीशाला फ्रेंड रिक्वेवस्ट पाठवली आणि तिथून आमच्या मैत्रीला सुरूवात झाली..आणि 6 वर्ष डेट केल्यानंतर 2016 मध्ये देविशाशी लग्न केलं.'

सूर्यकुमार यादवची कारकीर्द..

सूर्यकुमार यादव हा टी -२० क्रिकेटमधील अव्व्ल क्रमांकाचा फलंदाज आहे. त्याच्या टी -२० काकीर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने २८ टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४६.५ च्या सरासरीने १६७५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३ शतके तर १३ अर्धशतके झळकावली आहेत. तर २३ वनडे सामन्यांमध्ये त्याने २४.१ च्या सरासरीने ४३३ धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.