Asia Cup 2023: आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची प्लेइंग ११ जाहीर! माजी कर्णधाराला मिळू शकते मोठी जबाबदारी

Team India Playing 11: या स्पर्धेत काही अनुभवी खेळाडू कमबॅक करताना दिसून येणार आहेत.
team india
team indiasaam tv
Published On

Team India For Asia Cup 2023: भारतीय संघाला यावर्षी काही महत्वाच्या स्पर्धा खेळायच्या आहेत. नुकताच आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

तर येत्या ऑक्टोबर महिन्यात वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. या स्पर्धेपूर्वी ऑगस्ट महिन्यात आशिया चषक स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे.

या स्पर्धेत काही अनुभवी खेळाडू कमबॅक करताना दिसून येणार आहेत. तर माजी भारतीय खेळाडूला देखील मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

team india
Viral Cricket Video: फलंदाजाचा सुर्या स्टाईल सुपला शॉट अन् प्रेक्षकाने टिपला त्याहुन भन्नाट कॅच! VIDEO पाहायलाच हवा..

आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची प्लेइंग ११:

ऑगस्टच्या शेवटच्या महिन्यात आशिया चषक स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. त्यामुळे स्पर्धेतील ४ सामने पाकिस्तानमध्ये तर उर्वरित ९ सामने हे श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. आशिया चषक स्पर्धेची ट्रॉफी जिंकण्यासाठी भारतीय संघाची संभावित प्लेइंग ११ निवडण्यात आली आहे.

आक्रमक फलंदाज रोहित शर्मा या संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे. तर शुभमन गिल त्याला साथ देताना दिसून येऊ शकतो. तर केएल राहुल आणि विराट कोहली सारखे अनुभवी फलंदाज मध्यक्रमात तुफान फटकेबाजी करताना दिसून येऊ शकतात.

तसेच रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेलसारखे अष्टपैलू खेळाडू संघासाठी गोलंदाजीत आणि फलंदाजीत मोलाचं योगदान देताना दिसून येऊ शकतात. (Latest sports updates)

team india
Viral Cricket Video: टी-२० क्रिकेटमधील सर्वात महागडा चेंडू! पठ्ठ्याने एकाच चेंडूवर खर्च केल्या तब्बल १८ धावा; VIDEO एकदा पाहाच

एमएस धोनीला मिळू शकते मोठी जबाबदारी...

आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीला मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. तो या संघासाठी मेंटॉरची भूमिका पार पाडताना दिसून येऊ शकतो. यापूर्वी देखील २०२१ टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी त्याची मेंटॉर म्हणून निवड केली गेली होती. त्याने ही जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली होती.

पाहा संभावित प्लेइंग ११..

रोहित शर्मा( कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली,केएल राहुल (यष्टीरक्षक),श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या,रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com