Sunil Gavaskar On Team India: 'हा' खेळाडू होणार टीम इंडियाचा पुढील कर्णधार; दिग्गजाने केली मोठी भविष्यवाणी

Sunil Gavaskar On Team India Captaincy: अंजिक्य रहाणेची या मालिकेसाठी उपकर्णधार म्हणुन निवड केली गेली आहे
team india
team indiasaam tv
Published On: 

Sunil Gavaskar: येत्या काही दिवसात भारतीय संघ वेसर इंडिज दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा देखील करण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी चेतेश्वर पुजाराला विश्रांती देण्यात आली आहे. तर आयपीलएल स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाडला भारतीय संघात दिलं गेलं आहे.

तर अंजिक्य रहाणेची या मालिकेसाठी उपकर्णधार म्हणुन निवड केली गेली आहे. या निर्णयानंतर अनेक दिग्गजांनी टिका देखील केली आहे. अनेकांच असं म्हणणं आहे की, अंजिक्य रहाणे ऐवजी बीसीसीआयने कर्णधार म्हणुन पर्याय शोधायला हवा.

दरम्यान याबाबत बोलताना माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी मोठे वक्तव्य करत कर्णधारपदासाठी पर्याय सुचवला आहे.

team india
Team India: टीम इंडियाच्या स्टार फलंदाजाची कारकिर्द संपली? Asia Cup पाठोपाठ World Cup स्पर्धेलाही मुकणार..

भावी कर्णधाराबाबत बोलताना सुनील गावसकर म्हणाले..

सुनील गावसकर यांनी स्पोर्ट्स टुडेसोबत चर्चा करताना म्हटले की, 'शुभमन गिल आणि अक्षर पटेल हे असे २ खेळाडू आहेत, जे भविष्यात भारतीय संघाचे नेतृत्व करू शकतात. अक्षर पटेल जसजसा पुढे जातोय तशी त्याच्या कामगिरीत सुधारणा होत आहे. त्याची ही कामगिरी पाहता तो भारतीय संघाचा उपकर्णधार होऊ शकतो.'

तसेच ते पुढे म्हणाले की, 'जर ईशान किशनने भारतीय संघात आपलं स्थान निर्माण केलं तर तो देखील या शर्यतीत येऊ शकतो. अजिंक्य रहाणेला कसोटी संघाचं उपकर्णधारपद देणं वाईट मुळीच नाही. मात्र आता भारतीय संघाकडे नवा कर्णधार तयार करण्याची संधी होती.' (Latest sports updates)

team india
Team India Squad: चेतेश्वर पुजारा बाहेर! तर IPL गाजवणाऱ्या 'या' २ खेळाडूंना थेट टीम इंडियात संधी

आयपीएल २०२३ स्पर्धेत डेव्हिड वॉर्नरकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी दिली गेली होती. तर अक्षर पटेलची उपकर्णधार म्हणून निवड केली गेली होती. तर दुसरीकडे शुभमन गिलला नेतृत्व करण्याचा कुठलाही अनुभव नाही. त्याने अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेच्या वेळी उपकर्णधारपदाची जबाबदारी पार पाडली होती. त्यावेळी पृथ्वी शॉ हा भारतीय अंडर १९ संघाचा कर्णधार होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com