cheteshwar pujara
cheteshwar pujarasaam tv

Team India Squad: चेतेश्वर पुजारा बाहेर! तर IPL गाजवणाऱ्या 'या' २ खेळाडूंना थेट टीम इंडियात संधी

IND vs WI: अनुभवी चेतेश्वर पुजाराला संघाबाहेर करून २ युवा खेळाडूंना संघात स्थान दिलं गेलं आहे.

Team India Squad For IND vs WI Series: भारतीय संघ आता वेस्ट इंडिज संघासोबत हात करताना दिसून येणार आहे. येत्या १२ जुलैपासून भारत - वेस्ट इंडिज मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेसाठी शुक्रवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

या दौऱ्यावर भारतीय संघाला २ कसोटी, ३ वनडे आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. ३ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी अजिंक्य रहाणेची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर अनुभवी चेतेश्वर पुजाराला संघाबाहेर करून २ युवा खेळाडूंना संघात स्थान दिलं गेलं आहे.

cheteshwar pujara
Team India Squad Announced: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा! मराठमोळ्या रहाणेला मिळाली मोठी जबाबदारी

बीसीसीआयने जाहीर केलेल्या संघात रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे. तर अजिंक्य रहाणेला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

तर आयपीएल २०२३ स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या यशस्वी जयस्वालला देखील या संघात स्थान दिलं गेलं आहे. त्याने या हंगामात राजस्थान रॉयल्स संघासाठी दमदार कामगिरी केली होती. १४ सामन्यांमध्ये त्याने ६२५ धावा कुटल्या होत्या.

याच कामगिरीची दखल घेत, त्याची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी राखीव खेळाडू म्हणून निवड केली गेली होती. तसेच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये देखील त्याचा रेकॉर्ड दमदार आहे.

त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील १५ सामन्यांमध्ये १८४५, तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये १५११ आणि टी -२० क्रिकेटमध्ये १५४८ धावा केल्या आहेत.

ऋतुराजला मिळाली संधी..

आयपीएल २०२३ स्पर्धेत चेन्नईला चॅम्पियन बनवणाऱ्या ऋतुराजला देखील वनडे आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात स्थान दिले गेले आहे. या मालिकेत चेतेश्वर पुजाराला विश्रांती दिली गेली आहे. तर ऋतुराज गायकवाडला संघात स्थान दिलं गेलं आहे.

या दौऱ्यावर ऋतुराज गायकवाडला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकते. ऋतुराज गायकवाडने भारतीय संघासाठी १ वनडे आणि १० टी-२० सामने खेळले आहेत. (Latest sports updates)

cheteshwar pujara
Team India Plans: टीम इंडियाचंं वर्ल्ड कप ट्रॉफीचं स्वप्न पूर्ण होणार? फक्त 'हे' 5 बदल करतील चमत्कार

कसोटी मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ (Team India Test Squad)

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, पटेल, रवींद्र जडेजा. मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी

वनडे मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ (Team India ODI Squad For West Indies Tour:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्य कुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com