SRH vs LSG,Weather Update: हैदराबाद- लखनऊ सामना रद्द होणार? समोर आली मोठी अपडेट

Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants, IPL 2024: आयपीएल २०२४ स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपरजायंट्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.
SRH vs LSG Match may cancel due to rain know sunrisers hyderabad vs lucknow super giants latest weather udpate amd2000
SRH vs LSG Match may cancel due to rain know sunrisers hyderabad vs lucknow super giants latest weather udpate amd2000twitter

आयपीएल २०२४ स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपरजायंट्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना प्लेऑफच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या विजयानंतर प्लेऑफचं समीकरण गुंतागुंतीचं झालं आहे. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ आपला पूर्ण जोर लावताना दिसून येऊ शकतात. या सामन्यादरम्यान कसं असेल हवामान आणि खेळपट्टी कोणाला साथ? जाणून घ्या.

खेळपट्टी कोणाला देणार साथ?

हा सामना सनरायझर्स हैदराबादच्या होम ग्राऊंडवर म्हणजेच राजीव गांधी आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्री स्टेडियमवर रंगणार आहे. या स्टेडियमची खेळपट्टी ही फलंदाजांसाठी नेहमीच फायदेशीर ठरते. पहिल्या डावात फलंदाजी करताना हैदराबादने याच खेळपट्टीवर धावांचा पाऊस पाडला आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

SRH vs LSG Match may cancel due to rain know sunrisers hyderabad vs lucknow super giants latest weather udpate amd2000
RCB Playoff Scenario: राजस्थानच्या पराभवाने RCB चं टेन्शन वाढलं! प्लेऑफमध्ये जाण्यासाठी एकमेव पर्याय शिल्लक

कसं असेल हवामान?

या सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या टेन्शनमध्ये वाढ झाली आहे. कारण प्लेऑफमध्ये जाण्याच्या दृष्टीने हा सामना दोन्हीही संघांसाठी अतिशय महत्वाचा आहे. मात्र या सामन्याच्या पूर्वसंध्येला हैदराबादमध्ये जोरदार पाऊस पडला आहे. असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे की, सामन्याच्या दिवशीही पााऊस पडू शकतो. या सामन्यात पावसाने अडथळा निर्माण केल्यास दोन्ही संघांचं मोठं नुकसान होणार आहे.

SRH vs LSG Match may cancel due to rain know sunrisers hyderabad vs lucknow super giants latest weather udpate amd2000
T20 World Cup 2024: टी-२० वर्ल्डकपसाठी सूर्याचा मास्टरप्लान! IPL दरम्यान करतोय खास सराव; स्वत:च केला खुलासा

इथे पाहा लाईव्ह...

सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपरजायंट्स याच्यांत होणाऱ्या सामन्याची नाणेफेक भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता होईल. तर ७:३० वाजता सामन्यला सुरुवात होईल. हा सामना जिओ सिनेमा अॅपवर फ्री मध्ये पाहता येईल. जर तुम्ही टीव्हीवर हा सामना पाहत असाल, तर हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहता येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com