IND Vs SL Live Telecast : श्रीलंकेत 'सूर्या' तळपणार; Ind Vs SL मध्ये तगडी लढत, कधी-कुठे-कसे पाहाल सामने?; इथं फ्रीमध्ये बघाल!
IND Vs SLSaam Tv

IND Vs SL Live Telecast : श्रीलंकेत 'सूर्या' तळपणार; Ind Vs SL मध्ये तगडी लढत, कधी-कुठे-कसे पाहाल सामने?; इथं फ्रीमध्ये बघाल!

IND Vs SL T-20 Match: गौतम गंभीरच्या मुख्य प्रशिक्षकाखाली टीम इंडियाची ही पहिलीच मालिका आहे. टीम मॅनेजमेंटने श्रीलंका दौऱ्यासाठी हार्दिक पांड्याऐवजी सूर्यकुमार यादवची कॅप्टन म्हणून निवड केली आहे.
Published on

टी २० वर्ल्डकप जिंकल्यानंतर नव्या दमाचा भारतीय संघ श्रीलंकेत जाणार आहे. या दोन्ही संघात तगडी लढत होणार आहे. त्यांच्यात तीन सामन्यांची टी २० मालिका होणार आहे. शनिवारी म्हणजेच २७ जुलैपासून ही लढाई सुरू होत आहे. गौतम गंभीर पहिल्यांदाच मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे आणि टीम इंडियासोबत तो पहिल्यांदाच विदेश दौऱ्यावर गेला आहे. आता हे सामने कुठे, कधी लाईव्ह बघता येणार याबाबत टीम इंडियाच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.

टी २० वर्ल्डकप गाजवलेल्या हार्दिक पंड्याकडे टी २० संघाची धुरा देतील असं सर्वांनाच वाटत होतं. पण संघ व्यवस्थापनानं आश्चर्याचा धक्का देत टी २० स्पेशालिस्ट सूर्यकुमार यादव याच्याकडे नेतृत्व सोपवलं आहे. सूर्यकुमारने यापूर्वी ७ टी-२० सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केलं आहे. त्यामुळं त्याच्यावर कुठलाही अतिरिक्त दबाव असणार नाही, हे स्पष्ट होत आहे.

IND Vs SL Live Telecast : श्रीलंकेत 'सूर्या' तळपणार; Ind Vs SL मध्ये तगडी लढत, कधी-कुठे-कसे पाहाल सामने?; इथं फ्रीमध्ये बघाल!
Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक उद्घाटन समारंभापूर्वीच फ्रान्समध्ये मोठी गडबड; ८ लाख लोकांना बसला फटका

ही मालिका सुरू होण्याआधी दोन्ही टीममधील काही खेळाडूंना दुखापत झाल्याचे वृत्त आहे. टीम इंडियाचा मोहम्मद सिराज हा जायबंदी झाला आहे. मात्र त्याची दुखापत किती गंभीर आहे हे कळू शकलेले नाही. तर श्रीलंकेचा खेळाडू नुवान तुषारा आणि दुष्मंथा चमिरा हे दोघे आधीच मालिका खेळणार नाहीत. अशामध्ये टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात होणाऱ्या सामन्यांकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. हा सामना कधी, कुठे खेळला जाणार आहे आणि कुठे पाहायला मिळणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

IND Vs SL Live Telecast : श्रीलंकेत 'सूर्या' तळपणार; Ind Vs SL मध्ये तगडी लढत, कधी-कुठे-कसे पाहाल सामने?; इथं फ्रीमध्ये बघाल!
Ruturaj Gaikwad: महाराष्ट्राच्या संघात ऋतु'राज', रणजी ट्रॉफीसाठी करणार संघाचं नेतृत्व

IND Vs SL सामना कधी होणार?

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका पहिला टी-२० सामना शनिवार, २७ जुलै रोजी खेळवला जाईल.

IND Vs SL सामना कुठे खेळला जाईल?

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका पहिला टी- २० सामना पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

IND Vs SL सामना किती वाजता सुरू होईल?

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका पहिला टी-२० सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल. दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी अर्धा तास आधी मैदानात येतील.

IND Vs SL Live Telecast : श्रीलंकेत 'सूर्या' तळपणार; Ind Vs SL मध्ये तगडी लढत, कधी-कुठे-कसे पाहाल सामने?; इथं फ्रीमध्ये बघाल!
Pro Kabaddi: प्रो कबड्डीच्या 11 व्या हंगामाच्या ऑक्शनची तारीख ठरली! कुठे पाहता येणार लाईव्ह?

IND Vs SL सामना टीव्हीवर कसा पाहायचा?

तुम्ही सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका पहिला टी-२० सामना पाहू शकाल.

IND Vs SL सामना ऑनलाईन लाइव्ह स्ट्रिमिंग कसं बघावं?

तुम्ही SonyLIV अॅपवर टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका पहिला टी-२० सामना कुठेही बसून पाहू शकता.

IND Vs SL T20 सामन्याचे वेळापत्रक -

२७ जुलै - पहिला सामना संध्याकाळी ७ वाजता

२८ जुलै - दुसरा सामना संध्याकाळी ७ वाजता

३० जुलै - तिसरा सामना संध्याकाळी ७ वाजता

IND Vs SL Live Telecast : श्रीलंकेत 'सूर्या' तळपणार; Ind Vs SL मध्ये तगडी लढत, कधी-कुठे-कसे पाहाल सामने?; इथं फ्रीमध्ये बघाल!
Rashid Khan: राशिद खानचा अप्रतिम 'हेलिकॉप्टर शॉट', फटकेबाजी पाहून स्टेडियमवरील सर्वच थक्क Video Viral

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com