Rashid Khan: राशिद खानचा अप्रतिम 'हेलिकॉप्टर शॉट', फटकेबाजी पाहून स्टेडियमवरील सर्वच थक्क Video Viral

Rashid Khan Helicopter Shot Video: मेजर लीग क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानचा स्टार अष्टपैलू रशीद खानने एमआय न्यूयॉर्ककडून फलंदाजी करताना आश्चर्यकारक 'हेलिकॉप्टर शॉट' मारला. राशिदच्या फटकेबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.
Rashid Khan: राशिद खानचा अप्रतिम 'हेलिकॉप्टर शॉट', फटकेबाजी पाहून स्टेडियमवरील सर्वच थक्क Video Viral
Rashid Khan Helicopter Shot VideoSun News
Published On

अमेरिकेत खेळल्या जाणाऱ्या मेजर लीग क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानचा स्टार ऑलराउंडर राशिद खानने तुफान फलंदाजी केली. एमआय न्यूयॉर्ककडून फलंदाजी करताना रशिद खानने टेक्सास सुपर किंग्जविरुद्ध धमाकेदार फटकेबाजी केली. आपल्या या खेळीदरम्यान राशिद खानने एक 'हेलिकॉप्टर शॉट' खेळला हा फटका पाहून स्टेडियममध्ये उपस्थित असलेले सर्वजण थक्क झाले. रशिदच्या शॉटचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.

एमआय न्यूयॉर्क आणि टेक्सास सुपर किंग्सच्या दरम्यान खेळण्यात आलेल्या एलिमिनेटर सामन्यात अफगाणिस्तानच्या राशिद खानने तुफान फलंदाजी केली. परंतु राशिद खानची फटकेबाजी एमआय न्यूयॉर्क संघाला विजय मिळवण्यासाठी पुरक ठरली नाही. राशिद विजय मिळवून देऊ शकला नसला तरी त्याची झंझावाती खेळीने प्रेक्षकांची मने जिंकली. राशिद खानने फलंदाजी करताना 30 चेंडूत 55 धावांची खेळी केली.

आपल्या खेळीदरम्यान राशिदने 4 चौकार आणि 4 शानदार षटकार मारले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना एमआय न्यूयॉर्कने 20 षटकात 8 गडी गमावून 163 धावा केल्या. एमआय न्यूयॉर्ककडून फलंदाजी करताना राशिद खानने सर्वाधिक 55 धावांची खेळी केली. त्यानंतर मोनांक पटेलने 48 धावांची खेळी केली होती. या दोघांच्या शानदार खेळीमुळे संघाने 163 धावा केल्या.

या आव्हानाचा पाठलाग करताना टेक्सास सुपर किंग्सच्या संघाने गडी गमावला. तर 18.3 षटकांत आव्हान पर केलं. फाफ डू प्लेसिसने 47 चेंडूत 72 धावांची खेळी केली. आपल्या खेळीदरम्यान डु प्लेसिसने 6 चौकार आणि 3 शानदार षटकार मारले. त्यानंतर ड्वेन कॉनवेने 51 धावांची झंझावाती खेळी केली. ॲरॉन हार्डीने 40 धावांची तुफानी खेळी केली. टेक्सास सुपर किंग्जने हा सामना 9 गडी राखून जिंकला.

Rashid Khan: राशिद खानचा अप्रतिम 'हेलिकॉप्टर शॉट', फटकेबाजी पाहून स्टेडियमवरील सर्वच थक्क Video Viral
IPL Punjab Kings : आयपीएलपूर्वीच धक्कादायक घडामोडी; दिल्लीनंतर पंजाबमध्येही होणार उलटफेर, प्रीती झिंटाच्या मनात काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com