Sport News : W, W, W, W, W... विजयासाठी फक्त ४ धावांची गरज; मग ५ चेंडूत धडाधड पडल्या ५ विकेट्स, पाहा VIDEO

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, असं म्हटलं जात. क्रिकेटमध्ये काय होईल हे शेवटच्या षटकापर्यंत सांगणं कठीण आहे.
Five Wickets Off Five Balls Viral Video
Five Wickets Off Five Balls Viral VideoSaam TV

Cricket Five Wickets Off Five Balls Viral Video : क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, असं म्हटलं जात. क्रिकेटमध्ये काय होईल हे शेवटच्या षटकापर्यंत सांगणं कठीण आहे. एखादा संघ सामन्यावर मजबूत पकड बनवल्याचं दिसत असलं, तरी विरोधी संघ कधी सामन्यात परत येईल, याचा अंदाज बांधणं कठीण आहे, अशाच काहीसा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  (Latest Sports Updates)

Five Wickets Off Five Balls Viral Video
VIDEO: पत्नीबरोबर शार्दूल सैराट; झिंगाट गाण्यावर जबरदस्त धरला ताल

या सामन्यात एका संघाला शेवटच्या ६ चेंडूत फक्त ४ धावांची गरज होती. याशिवाय त्यांच्या हातात ५ विकेट्स देखील होत्या. हा संघ सामना सहज जिंकणार असं वाटत असताना, शेवटच्या षटकांत सामना फिरला. गोलंदाजाने भेदक मारा करत सलग ५ चेंडूत ५ विकेट्स घेतल्या. परिणामी विजयाचा दावेदार असलेला संघ सामन्यात पराभूत झाला. (Latest Marathi News)

वास्तविक गेल्या शनिवारी महिला राष्ट्रीय क्रिकेट लीगचा अंतिम सामना खेळला गेला. दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि तस्मानिया महिला संघ यांच्यात हा सामना झाला, जो शेवटच्या षटकात तस्मानियाने १ धावाने जिंकला. शेवटच्या षटकापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या झोळीत विजय दिसत होता, परंतु शेवटच्या ६ चेंडूंच्या आत अशा घटना घडल्या ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

दक्षिण ऑस्ट्रेलियाला शेवटच्या षटकात सामना जिंकण्यासाठी फक्त ४ धावांची गरज होती. त्यांच्याकडे ५ खेळाडू शिल्लक होते. याशिवाय मैदानावर असलेले फलंदाज जबरदस्त कामगिरी करत होते. पण इथे नशिबाने खेळ केला. तस्मानियाच्या कर्णधार एलिस व्हिलानीने शेवटच्या षटकासाठी सारा कोयटेकडे चेंडू दिला.

तिने शेवटच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अ‍ॅनी ओ'नीलला बाद केले. येथून सामन्याला कलाटणी मिळाली. पुढच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाने एक धाव काढली, पण त्यानंतर सलग ४ चेंडूत ४ विकेट पडल्या. यादरम्यान २ खेळाडू धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले, एक एलबीडब्ल्यू आणि एक यष्टीमागे स्टंप झाला. एकूण ६ चेंडूत ५ विकेट पडल्या आणि तस्मानियाने १ धावाने सामना जिंकला. शेवटच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून धरणाऱ्या या सामन्याचा व्हिडीओ (Viral Video) व्हायरल होत आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com