FIFA prize money: स्पेन मालामाल! वर्ल्डकप हरूनही मेस्सीच्या अर्जेंटिनावर कोट्यवधींचा पाऊस; प्रत्येक टीमवर फिफाने किती केली पैशांची बरसात?

FIFA World Cup 2026 Prize Money: फिफा वर्ल्ड कप 2026 जिंकल्यानंतर स्पेनला विक्रमी 50 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 481 कोटी रुपये) बक्षीस मिळालं. अर्जेंटिनाला उपविजेतेपदासाठी 33 दशलक्ष डॉलर्स मिळाले, तर फिफाने यंदा 48 संघांसाठी बक्षीस निधीतही मोठी वाढ केली.
FIFA prize money
FIFA prize moneysaam tv
Published On

स्पेनचा कर्णधार रोड्रीच्या नेतृत्वाखालील टीमने फिफा वर्ल्ड कप 2026 जिंकत इतिहास रचला. अंतिम सामन्यात स्पेनने अर्जेंटिनावर 1-0 अशी मात केली. निर्धारित वेळेत निकाल लागला नाही त्यामुळे सामना अतिरिक्त वेळेत गेला. याच अतिरिक्त वेळेत फेरान टोरेसने गोल करत स्पेनला वर्ल्डकप मिळवून दिला. मात्र, या विजयाची कमाई फक्त ट्रॉफीपुरतीच मर्यादित राहिली नाही. विश्वविजेते ठरताच स्पेनने फिफाच्या इतिहासातील सर्वाधिक बक्षीस रक्कमही आपल्या नावावर केलीये.

विश्वविजेत्या स्पेनवर पैशांचा पाऊस

फिफाने स्पेनला विजेतेपदासाठी तब्बल 50 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 481 कोटी रुपये) इतकी बक्षीस रक्कम दिलीये. फिफा वर्ल्ड कपच्या इतिहासात कोणत्याही विजेत्या टीमला मिळालेली ही सर्वात मोठी रक्कम आहे. याआधी 2022 च्या वर्ल्डकप विजेते ठरलेल्या अर्जेंटिनाला 42 दशलक्ष डॉलर्स मिळाले होते. म्हणजेच यावेळी विजेत्यांच्या बक्षीस रकमेत तब्बल 8 दशलक्ष डॉलर्सची वाढ करण्यात आलीये.

FIFA prize money
FIFA World Cup 2026 : फायनल सामन्यात मेस्सीची जादू पडली फिकी; फेरान टोरेसच्या निर्णायक गोलने स्पेनने 16 वर्षांनी जिंकला वर्ल्डकप

उपविजेत्या अर्जेंटिनालाही मिळाली मोठी रक्कम

अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला असला तरी अर्जेंटिनालाही मोठं बक्षीस मिळालंय. उपविजेत्या संघाला 33 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 318 कोटी रुपये) देण्यात आलेत. ही रक्कमही मागील वर्ल्डकपच्या तुलनेत 3 दशलक्ष डॉलर्सने अधिक आहे. तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या इंग्लंडला 29 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 279 कोटी रुपये) तर चौथ्या क्रमांकावर समाधान मानणाऱ्या फ्रान्सला 27 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 260 कोटी रुपये) मिळालेत.

FIFA prize money
Lionel Messi: इंग्लंड जिंकणार वाटत असतानाच मेस्सीने फिरवली जादूची कांडी; अवघ्या 7 मिनिटांत मिळवलं फायनलचं तिकीट, वाचा नेमकं काय घडलं?

स्पर्धेत लवकर बाहेर पडलेल्या टीम्सनाही कोट्यवधींचं बक्षीस

यंदाच्या 48 टीमच्या नव्या फॉरमॅटमध्ये फिफाने बक्षीस रकमेत मोठी वाढ केली होती. उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचलेल्या प्रत्येक टीमला 19 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 183 कोटी रुपये) देण्यात आले. प्री-क्वार्टर फायनल (राऊंड ऑफ 16) मध्ये बाहेर पडलेल्या प्रत्येक टीमला 15 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 144 कोटी रुपये) मिळाले. राऊंड ऑफ 32 मध्ये पराभूत झालेल्या टीम्ससाठी 11 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 106 कोटी रुपये) इतकं बक्षिस होतं. तर साखळी फेरीतच स्पर्धेबाहेर पडलेल्या प्रत्येक टीमलाही 9 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 87 कोटी रुपये) इतकी बक्षीस रक्कम देण्यात आली.

FIFA prize money
Lionel Messi: इतिहास रचणाऱ्या लिओनेल मेस्सीला फायनलपूर्वी बसला मोठा धक्का, एम्बाप्पेने एका रात्रीत बदललं सगळं समीकरण

स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच मिळाले कोट्यवधी

यावेळी फिफाने वर्ल्डकपसाठी पात्र ठरलेल्या सर्व 48 टीम्सना स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच आर्थिक मदत दिली. प्रत्येक टीमला पात्रता मिळाल्याबद्दल 10 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 96 कोटी रुपये) आणि तयारीसाठी अतिरिक्त 2.5 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 24 कोटी रुपये) देण्यात आली. म्हणजेच कोणत्याही टीमने पहिला सामना खेळण्यापूर्वीच त्यांच्या खात्यात 12.5 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 120 कोटी रुपये) जमा झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com