IPL 2025 Retention: IPL ऑक्शनआधी शुभमन गिलचा मोठा निर्णय! गुजरातकडून खेळणार,पण...

Shubman Gill, IPL 2025: येत्या काही दिवसांत आयपीएल ऑक्शन होणार आहे. या ऑक्शनपूर्वी शुभमन गिलने मोठा निर्णय घेतला आहे.
IPL 2025 Retention: IPL ऑक्शनआधी 
शुभमन गिलचा मोठा निर्णय! गुजरातकडून खेळणार,पण...
shubman gill twitter
Published On

Shubman Gill, IPL 2025 Retention: आयपीएल २०२५ स्पर्धेसाठीच्या लिलावापूर्वी सर्व संघांना आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करायची आहेत. आज (३१ ऑक्टोबर) ही यादी देण्याची शेवटची तारीख आहे. त्यापूर्वी एक मोठी बातमी समोर येत आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलच्या मानधनात घट होणार असल्याचं म्हटलं जात आहे. गुजरात टायटन्स संघासाठी रिटेन होणारा तो दुसरा खेळाडू असणार आहे.

IPL 2025 Retention: IPL ऑक्शनआधी 
शुभमन गिलचा मोठा निर्णय! गुजरातकडून खेळणार,पण...
IND vs NZ 3rd Test: विराट ते रोहित... हे 4 भारतीय खेळाडू मुंबईत शेवटचा कसोटी सामना खेळणार

माध्यमातील वृत्तानुसार, गुजरात टायटन्सचा संघ पहिल्या क्रमांकावर स्टार फिरकीपटू राशिद खानला रिटेन करणार आहे. त्यामुळे शुभमन गिलला दुसऱ्या क्रमांकावर रिटेन केलं जाईल. या दोन्ही स्टार खेळाडूंसह अन्कॅप्ड खेळाडू म्हणून साई सुदर्शन, शाहरुख खान, राहुल तेवतिया यांना रिटेन केले जाऊ शकते.

यासह मेगा ऑक्शनमध्ये या संघाकडे RTM कार्डचा वापर करून आणखी एक स्टार खेळाडू आपल्या संघात कायम ठेवण्याची संधी असणार आहे. गेल्या हंगामात हार्दिक पंड्याने संघाची साथ सोडल्यानंतर शुभमन गिलकडे नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली होती. यावेळीही तो संघाचा कर्णधार असू शकतो.

IPL 2025 Retention: IPL ऑक्शनआधी 
शुभमन गिलचा मोठा निर्णय! गुजरातकडून खेळणार,पण...
IND vs NZ 3rd Test: मुंबई कसोटीसाठी टीम इंडियात बदल! स्टार गोलंदाजाला मिळणार संधी

एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मानधनात होणारी घट शुभमन गिलला मान्य आहे. संघ मजबूत करण्यासाठी राशिद खानला रिटेन करणं गरजेचं आहे. मात्र रिटेन केल्यानंतर हे दोघेही स्टार खेळाडू आगामी हंगामात गुजरातकडून खेळताना दिसून येतील.

काय आहे नियम?

आयपीएलने आगामी हंगामासाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. या नव्या नियमावलीनुसार, पहिल्या खेळाडूला रिटेन केल्यानंतर, १२० कोटींपैकी १८ कोटी रुपये द्यावे लागतील. तर दुसऱ्या स्थानी रिटेन होणाऱ्या खेळाडूला १४ कोटी रुपये द्यावे लागतील. जर एखाद्या संघाला अन्कॅप्ड खेळाडूला रिटेन करायचं असेल, तर त्यांना ४ कोटी रुपये मोजावे लागतील. एखाद्या संघाने ५ खेळाडूंना रिटेन केलं, तर १२० पैकी ७५ कोटी रुपये वजा केले जातील

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com