टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि फलंदाज शिखर धवन पुन्हा एकदा लग्नाची गाठ बांधणार आहे. मागच्या अनेक दिवसांपासून शिखर आणि सोफी शाईन यांच्या रिलेशनच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता या चर्चाना पूर्णविराम मिळाला असून हे दोघेही लवकरच नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहे.
नवी दिल्ली येथे या भव्य विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात दिल्ली-एनसीआरमध्ये ग्रँड वेडीग पार पडणार असून दिग्गज महारथी या सोहळ्यास उपस्थित राहणार आहे. शिखर आणि सोफी यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मैत्रीचे नाते आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 दरम्यान जेव्हा ते स्टेडियममध्ये एकत्र दिसले, तेव्हापासूनच त्यांच्या नात्याची चर्चा सुरू झाली होती.
कोण आहे सोफी शाईन?
शिखरची होणारी दुसरी बायको ही भारताची नसून आयर्लंडची रहिवासी आहे आणि तिचे शिक्षण देखील तिकडेच झाले आहे. आयर्लंडमधील कसलरॉय कॉलेजमधून तिने शिक्षण पूर्ण केले असून लिमेरिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मार्केटिंग आणि मनेजमेंटची पदवी प्राप्त केले आहे.
ती सध्या अबुधाबी येथील नॉर्दन ट्रस्ट कॉर्पोरेशन सेकंड व्हाईस प्रेसिडेंट म्हणून कार्यरत आहे. एवढेच नाही तर ती शिखर धवनच्या 'दा वन स्पोर्टस या उपक्रमांतर्गत चालणाऱ्या शिखर धवन फाउंडेशन चे कामही सांभाळत आहे.
शिखर धवनचे दुसरे लग्न आणि वैयक्तीक आयुष्य
शिखर धवनचे पहिले लग्न आयशा मुखर्जीसोबत झाले होते. मात्र 2023 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना 11 वर्षांचा जोरावर नावाचा मुलगा देखील आहे. घटस्फोटानंतर शिखरने स्वतःला कसेतरी सांभाळले आणि आता तो सोफीसोबत नवीन आयुष्याची सुरुवात करताना दिसत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.