

ईडीकडून सुरेश रैना आणि शिखर धवन यांच्या ११.१४ कोटींच्या मालमत्तेवर तात्पुरती जप्ती
मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (PMLA) कारवाई
दोन्ही माजी क्रिकेटपटूंवर 1xBet च्या बेकायदेशीर जाहिराती केल्याचा ठपका
भारतात बेटिंग (सट्टेबाजी) सर्व प्लॅटफॉर्म बंद
ईडीने माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवनची एकूण ११.१४ कोटींची मालमत्ता तात्पुरती स्वरुपात जप्त केली आहे. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत त्यांच्या मालमत्तेवर तात्पुरती जप्ती आणली आहे. यात रैनाच्या नावावर ६.६४ कोटी किंमतीचे म्युच्युअल फंड गुंतवणूक आणि शिखर धवनच्या नावावर ४.५ कोटी किंमतीच्या स्थावर मालमत्तेचा समावेश आहे.
अनेक राज्यात दाखल झालेल्या एफआयआरच्या आधारावर ईडीने ही करावाई केली. बेकायदेशीर ऑनलाइन प्लॅटफॉर्म 1xBet संबंधित प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. दोन्ही माजी क्रिकेटपटूंवर परदेशी संस्था 1xBet आणि त्याच्याशी संबंधित प्लॅटफॉर्मची बेकायदेशीर जाहिरात केल्याचा ठपका आहे. त्यांच्यावर बेकायदेशीररित्या जाहिरात आणि ऑनलाईन बेटिंग आणि जुगाराला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप आहे.
काही दिवसांपूर्वी युवराज सिंह, रॉबिन उथप्पा, सोनू सूद, उर्वशी रोतैला, मिमी चक्रबर्ती, अनुष्का हाजरा, सुरेश रैना आणि शिखर धवन यांची चौकशी करण्यात आली होती. या अॅपशी संबंधित लोकांनी अनेक गुंतवणूकदार आणि कोट्यवधी लोकांना फसवलं आहे. त्यांनी कर देखील बुडवला आहे.
दुसरीकडे भारतात 1xBet, FairPlay, Parimatch आणि Lotus365 यांसारख्या अॅपवर बंदी आहे. ईडीच्या सूत्रांच्या माहितीनुसार, बेटिंग प्लॅटफॉर्म हे जाहिरातीमध्ये 1xbat आणि 1xbat Sporting Lines अशी नावे वापरत होते. या जाहिरातींमध्ये QR कोड असत. युजरने हा कोड स्कॅन केल्यास त्याला थेट बेटिंग साइट्सवर घेऊन जात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.