Medha Kulkarni Hospitalised : लवकरच भेटू, भाजप खासदार मेधा कुलकर्णी रुग्णालयात दाखल, पुणेकरांसाठी लिहिला खास संदेश

bjp MP Medha Kulkarni Hospitalised : भाजप खासदार मेधा कुलकर्णी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांनी पुणेकरांना खास संदेश दिला आहे.
Medha Kulkarni News
Medha Kulkarni Hospitalised Saam tv
Published On
Summary

पुण्यातील BJP खासदार मेधा कुलकर्णी रुग्णालयात दाखल

प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू

मेधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर पुणेकरांना त्यांच्या तब्येतीविषयी माहिती दिली.

प्रकृती सुधारल्यावर त्यांनी लवकरच भेटण्याचा संदेश त्यांनी दिला.

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुण्यातील राज्यसभेच्या भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे खासदार मेधा कुलकर्णी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत.

भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पुणेकरांना ही माहिती दिली. प्रकृतीत सुधारणा झाल्यावर लवकरच भेटू, असं म्हणत मेधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करताच त्यांचे समर्थक त्या बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

Medha Kulkarni News
Raj Thackeray : ...अन् तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयोगावर राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडलं? VIDEO

मेधा कुलकर्णी यांनी पोस्टमध्ये काय म्हटलं?

मेधा कुलकर्णी यांनी रुग्णालयात दाखल केल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी रुग्णालयात दाखल झाल्याचा महत्वाचा संदेश पुणेकरांना दिला. काही दिवस तुमच्या संपर्कात नसेन, असं म्हणत खासदार कुलकर्णी यांनी दिलगीरी देखील व्यक्त केलीये.

Medha Kulkarni News
Politics : बडा खेला हो गया! मतदानाच्या आदल्या दिवशीच मोठा गेम; 'जन सुराज'च्या नेत्याचा उमेदवारी सोडून भाजपमध्ये प्रवेश

मेधा कुलकर्णी पोस्टमध्ये काय म्हणाल्या?

'प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी उपचारार्थ रुग्णालयामध्ये दाखल झाले आहे. त्यामुळे काही दिवस आपल्या संपर्कात नसेन. त्याबद्दल दिलगीर आहे.काही काम असल्यास आपण माझ्या कार्यालयाशी संपर्क करु शकता. प्रकृतीत सुधारणा झाल्यावर लवकरच भेटू, असे त्या पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत. मेधा कुलकर्णी यांना नेमकं कोणत्या कारणासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, याची सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com