अखेर सॅमसनची एन्ट्री! टीम इंडियाच्या प्लेइंग ११ मध्ये दोन मोठे बदल, कुणाला संघातून वगळलं?

Ind vs Zim : टी २० वर्ल्डकपमध्ये आज भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात अत्यंत महत्वाची लढत होत आहे. भारतानं टॉस गमावला आहे. झिम्बाब्वेनं टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केलं आहे. भारताच्या प्लेइंग ११ मध्ये दोन बदल करण्यात आले आहेत.
भारताच्या प्लेइंग ११ मध्ये दोन मोठे बदल, कुणाला मिळाला डच्चू?
Ind vs ZimSaam TV
Published On

दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडीजला पराभूत केल्यानं भारताचं सेमिफायनलचं समीकरण अगदी सोपं झालं आहे. यानंतर झिम्बाब्वेविरुद्ध आज होणाऱ्या महत्वाच्या सामन्यात भारताला विजय मिळवणे महत्वाचे आहे. या सामन्यात झिम्बाब्वेनं टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केलं आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या पराभवानंतर संघात संजू सॅमसनला संधी दिली जावी, असे सल्ले दिग्गज क्रिकेटपटूंकडून दिले जात होते. अखेर झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसनला संधी देण्यात आली असून, अक्षर पटेलचा देखील प्लेइंग ११ मध्ये समावेश करण्यात आला आहे.

भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात आज सुपर ८ मधील अत्यंत महत्वाचा सामना आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर ही लढत होत आहे. झिम्बाब्वेनं टॉस जिंकून भारताला फलंदाजीसाठी निमंत्रित केलंय. भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. वॉशिंग्टन सुंदर याच्या जागी उपकर्णधार अक्षर पटेल याला संधी दिली आहे. तर रिंकु सिंगला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर केलं असून, संजू सॅमसनचा समावेश केला आहे.

यजमान भारतीय संघासाठी हा सामना करो या मरो असा आहे. ग्रुप १ मध्ये भारताला सुपर ८ च्या पहिल्या फेरीत दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. भारताचा ७६ धावांनी पराभव झाला होता. दारूण पराभवामुळे भारताचा नेट रनरेट अत्यंत खराब झाला होता. सेमिफायनलमधील मार्गात मोठा अडथळा निर्माण झाला होता. सेमिफायनलचं समीकरण भारतासाठी क्लिष्ट झाले होते. पण दक्षिण आफ्रिकेकडून वेस्ट इंडीज पराभूत झाल्यानं कठीण समीकरण सोपे झाले आहे. भारताला आजचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकायचा आहे. त्यानंतरच्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यातही विजय मिळवणे क्रमप्राप्त आहे.

भारताच्या प्लेइंग ११ मध्ये दोन मोठे बदल, कुणाला मिळाला डच्चू?
T20 World Cup : वर्ल्डकपमधून विश्वविजेतेपदाचा प्रबळ दावेदार संघ आऊट, श्रीलंका बाहेर; न्यूझीलंडचा दणदणीत विजय

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वातील भारतीय संघ सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. झिम्बाब्वे चौथ्या स्थानी आहे. पहिल्या सामन्यात वेस्ट इंडीजनं त्यांना धूळ चारली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com