

टी-२० वर्ल्डकपवर टीम इंडियाने नाव करत सर्व भारतीयाचं स्वप्न पूर्ण केलंय. रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारताने न्यूझीलंडचा ९६ रन्सने पराभव केला आहे. विजयानंतर टीम इंडियाचा गोलंदाज अर्शदीप सिंगने खरी मजा लुटली.वर्ल्डकपचा खिताब जिंकल्यानंतर काही वेळातच अर्शदीप सिंगने सोशल मीडियावर रील्स बनवून पोस्ट करण्यास सुरुवात केली.
या रील्समध्ये अर्शदीपने स्वतःसोबत संजू सॅमसन, गौतम गंभीर, जसप्रीत बुमराह यांनाही घेतलंय. हे रील्स इतके मजेशीर आहेत की, चाहत्यांना ते आवडले असून त्यांनी विविध कमेंट्स केल्यात.
अर्शदीपचं सर्वात पहिलं रील संजूसोबत होतं. गेले अनेक वर्ष टीममध्ये आणि बाहेर राहिल्यानंतर अखेर संजूने त्याला मिळालेल्या संधीचं सोनं केलं. संजूने या वर्ल्डकपच्या फायनल सामन्यात ४६ चेंडूत ८९ रन्स करून त्याचं नाण खणखणीत वाजवलंय. अर्शदीपने संजूला रील फ्रेममध्ये घेतलं आणि म्हणाला, "पाजी, जस्टीस मिळाला आहे!"
सोशल मीडियावर गेल्या काही वर्षांपासून 'जस्टिस फॉर संजू सॅमसन' असं ट्रेंड होत होतं. अखेर संजूला न्याय मिळाला. संजूने या टूर्नामेंटमध्ये ५ सामन्यांमध्ये ३२१ रन्सची खेळी केली. यावेळी त्याला प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा खिताब मिळाला.
मुख्य म्हणजे अर्शदीपने त्याच्या रीलच्या माध्यमातून असाध्य गोष्टही साध्य करून दाखवलीये. यावेळी त्याने चक्क गंभीरला हसवलंय. त्याने टीम इंडियाचा प्रमुख कोच गौतम गंभीरला कॅमेरात घेऊन, 'पाजी कभी हस भी लिया करो' असं म्हटलंय. त्याचं वाक्य ऐकताचं गंभीरलाही हसू आवरलं नाही. तर इशानसोबत 'एक बिहारी, सब पे भारी!' या टॅगलाईनवर रील तयार केलंय.
अर्शदीपने अंतिम सामन्यात प्लेअर ऑफ द मॅच जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्यासोबत एक रील शेअर केलंय. बुमराहच्या घातक गोलंदाजीने न्यूझीलंडच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. बुमराहने या सामन्यात ४ विकेट घेत संपूर्ण स्पर्धेत १४ विकेट्स घेतलेत.
अर्शदीपने त्याच्या शेवटच्या सोलो रीलमध्ये भारत सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकल्याबद्दल अभिमान व्यक्त केलाय. २०२४ मध्ये १७ विकेट्स घेणारा अर्शदीप हसतो आणि म्हणतो, "आम्ही हे पहिल्यांदा केलं तेव्हा आनंद झाला, त्यामुळे आता दुसऱ्यांदा करावं लागतंय." भारत हा एकमेव असा संघ आहे ज्याने आतापर्यंत तीनवेळा टी-२० वर्ल्डकपवर नाव कोरलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.