
MS Dhoni Captain CSK : चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त आहे. दुखापतींमुळे तो उर्वरित सामने खेळणार नाही. आयपीएल २०२५ मधून बाहेर पडण्याचा निर्णय गायकवाडने घेतला आहे. त्याच्या जागी महेंद्रसिंह धोनीकडे कर्णधारपदाची जबाबदारी असेल अशी अधिकृत घोषणा चेन्नईकडून करण्यात आली आहे.
'कोपराच्या हेअरलाइन फ्रॅक्चरमुळे ऋतुराज गायकवाड आयपीएल २०२५ मधून बाहेर पडला आहे. उर्वरित सामन्यांमध्ये एमएस धोनी कर्णधारपदाची धुरा सांभाळेल', असे वक्तव्य चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले. या संबंधित अधिकृत पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे.
'कर्णधार ऋतुराज गायकवाड कोपराच्या फ्रॅक्चरमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे. आता महेंद्रसिंह धोनी संघाचे नेतृत्त्व करेल. लवकर बरा हो ऋतु' अशी पोस्ट चेन्नई सुपर किंग्सच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. त्यानंतर सीएसकेने कॅप्टन धोनीचा फोटो देखील शेअर केला. धोनी पुन्हा कर्णधार बनल्याने थालाच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
३० मार्च रोजी गुवाहाटी मध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्यादरम्यान ऋतुराज गायकवाडच्या कोपराला दुखापत झाली होती. तुषार देशपांडेच्या ओव्हरमध्ये ऋतुराजच्या हाताच्या कोपरावर बॉल जोरात आदळला होता. यामुळे त्याला वेदना झाल्याचे पाहायला मिळाले होते. दुखापतीमुळे दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात गायकवाडच्या जागी धोनी संघाचे नेतृत्त्व करेल अशा चर्चा सुरु होत्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.