क्रीडा जगताला धक्का देणारं वृत्त हाती आलं आहे. २४ वर्षीय उदयोन्मुख धावपटू केल्विन किप्टम याचा कार अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पश्चिम केनियामध्ये झालेल्या कार अपघातात केल्विनचा मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)
कारमध्ये तिघे जण बसले होते. या कारमधील दोघांचा अपघातात मृत्यू झाला. तर महिला प्रवासी गंभीर जखमी झाली. या दोघांमध्ये केल्विन आणि त्याचा प्रशिक्षकाचा सामावेश आहे. अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
शिकागोमध्ये २.००.३५ हा नवा विश्वविक्रम करत केल्विन हा प्रसिद्ध झाला होता. त्यावेळी केल्विन २३ वर्षांचा होता. त्याने केवळ तीन मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आहे.
केल्विनच्या नावावर पुरुष मॅरेथॉनमध्ये विश्वविक्रम केला होता. गेल्या दोन वर्षात तो प्रचंड चर्चेत होता. त्याच्या विक्रमी कामगिरीमुळे केल्विनची जोरदार चर्चा सुरु होती.
२०२२ वेलेन्सियामध्ये फुल मॅरेथॉन त्याने 2 तास 1 मिनिट आणि 53 सेकंदात पूर्ण करत अनेकांना प्रभावित केलं होतं. त्यानंतर वर्षभरानंतर तिसरी मॅरेथॉन स्पर्धेकत धावताना नवा विक्रम केला होता. त्याने केनियाच्याच एल्युड किपचोगेचा विश्वविक्रम मोडला होता.
केल्विन वयाच्या १३ व्या वर्षी धावण्यास सुरुवात केली. केल्विनने सुरुवातीला स्थानिक मॅरेथॉनमध्ये धावण्यास सुरुवात केली. त्यानंतर पहिल्यांदा हाफ मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. त्या मॅरेथॉनमध्ये तो जिंकलाही होता. केल्विनने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये पदार्पण केले. केल्विनच्या सर्वत्र शोक व्यक्त होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.