RR VS CSK Highlights : सुपर किंग्स सुपर फेल..! अटीतटीच्या सामन्यात थालाच्या चेन्नईचा पराभव, राजस्थानचा 'रॉयल' विजय

RR VS CSK Match Result : गुवाहाटीमध्ये राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स ही लढत रंगली होती. या सामन्यात शेवटच्या क्षणी राजस्थानने चेन्नईच्या हातून विजयाचा घास ओढून घेतला. आजच्या सामन्यात राजस्थानचा ६ धावांनी विजय झाला.
RR VS CSK Match Result
RR VS CSK Match Resultx (twitter)
Published On

IPL 2025 : गुवाहाटीमध्ये रंगलेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा रोमांचक सामना रंगला. या सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्सचा ६ धावांनी विजय झाला. शेवटच्या ओव्हरपर्यंत खेळ सुरु होता. अटीतटीच्या सामन्यात कोण जिंकेल हे सांगणे कठीण होते. पण संदीप शर्माने शेवटच्या ओव्हरमध्ये चेन्नईच्या फलंदाजांना विजयी धावा करण्यापासून रोखले. आयपीएल २०२५ मध्ये राजस्थानने पहिला विजय नोंदवला.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा आयपीएल २०२५ मधील सामना गुवाहाटीमध्ये खेळला जात आहे. या सामन्यामध्ये चेन्नईचा ऋतुराज गायकवाडने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानने दोन सामने गमावले. त्यामुळे हा सामना राजस्थानसाठी अटीतटीचा होता.

RR VS CSK Match Result
Kavya Maran SRH : हैदराबादचा पराभव अन् मालकिण बाई भडकल्या, काव्या मारनने घेतला मोठा निर्णय, नेमकं प्रकरण काय?

यशस्वी जैस्वाल आणि संजू सॅमसन स्वस्तात माघारी परतल्यानंतर नितीश राणाने पुढाकार घेत दमदार खेळ केला. त्याने ३६ चेंडूत शानदार ८१ धावा फटकावत संघाला मजबूत स्थितीत आणले. या खेळीदरम्यान त्याने १० चौकार आणि ५ षटकार ठोकले. कर्णधार रियान परागनेही १८ चेंडूत २३ धावा करत महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या खेळीमुळे राजस्थान रॉयल्सने २० ओव्हर्समध्ये १८२ धावा केल्या.

RR VS CSK Match Result
RR VS CSK Live Match : झुकेगा नही साला...! विकेट घेतल्यानंतर हसरंगामध्ये अवतरला पुष्पा, कृतीनं वेधलं लक्ष

दुसऱ्या बाजूला रचिन रवींद्र आणि राहुल त्रिपाठी ही जोडीही फेल झाली. शिवम दुबे १८ धावा करुन मैदानाबाहेर गेला. कर्णधार ऋतुराज गायकवाड एका बाजूने चेन्नईची खिंड लढवत होता. त्याने ४४ बॉल्समध्ये ६३ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर एमएस धोनी आणि रवींद्र जडेजा यांनी परिस्थितीनुसार खेळ केला. शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर धोनी कॅचआउट झाला. शेवटच्या ओव्हरपर्यंत चेन्नईने लढा दिला पण त्याचा पराभव झाला. सीएसकेने २० ओव्हर्समध्ये १७६ धावा केल्या.

RR VS CSK Match Result
Hardik Pandya IPL 2025 : नाव न घेताच हार्दिकचा हिटमॅनवर निशाणा? पराभवाचं कारण सांगत म्हणाला...

चेन्नईची प्लेईंग ११ -

रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), विजय शंकर, रवींद्र जडेजा, एमएस धोनी, आर. अश्विन, जेमी ओव्हर्टन, नूर अहमद, अहमद खलील, मथिशा पाथिराणा.

राजस्थानची प्लेईंग ११ -

यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसंग, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महीश थीक्षणा, संदीप शर्मा, तुषार देशपांडे

RR VS CSK Match Result
Srh vs Dc Live : सुपरमॅन.. हवेत झेपावून पकडला कॅच, दिल्लीच्या खेळाडूची फिल्डिंग पाहून सगळेच शॉक; Video व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com