RR VS CSK Live Match : झुकेगा नही साला...! विकेट घेतल्यानंतर हसरंगामध्ये अवतरला पुष्पा, कृतीनं वेधलं लक्ष

Wanindu Hasaranga Pushpa Celebration : राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हा सामना गुवाहाटीमध्ये सुरु आहे. या सामन्यादरम्यान राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू वनिंदू हसरंगाचा विकेट सेलिब्रेशन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
Wanindu Hasaranga
Wanindu Hasarangax (twitter)
Published On

Wanindu Hasaranga Video : गुवाहाटीमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स ही लढत सुरु आहे. या सामन्यामध्ये टॉस जिंकत चेन्नईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थान रॉयल्सने २० ओव्हर्समध्ये १८२ धावा केल्या. त्यानंतर चेन्नईचे खेळाडू फलंदाजी करण्यासाठी आले. याच दरम्यान वनिंदू हसरंगाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स सामन्यादरम्यान राजस्थानचा फिरकीपटू वनिंदू हसरंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हसरंगाने पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळत आहे. चेन्नईचा राहुल त्रिपाठी आणि विजय शंकर या दोघ्याच्या विकेट घेतल्यानंतर त्याने हे सेलिब्रेशन केल्याचे म्हटले जात आहे.

Wanindu Hasaranga
Kavya Maran SRH : हैदराबादचा पराभव अन् मालकिण बाई भडकल्या, काव्या मारनने घेतला मोठा निर्णय, नेमकं प्रकरण काय?

नेमकं काय घडलं?

पॉवर प्ले संपल्यानंतर वनिंदू हसरंगा सातव्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आला. तोपर्यंत चेन्नईच्या फलंदाजांनी ४६ धावा काढल्या होत्या. ओव्हरच्या पहिल्या बॉलवर राहुल त्रिपाठीने शॉट मारला आणि डीप मिड विकेटच्या दिशेने बॉल गेला. शिमरोन हेटमायरने धावत राहुल त्रिपाठीची कॅच पकडली. पहिल्याच ओव्हरच्या पहिल्या बॉलवर विकेट घेतल्यानंतर हसरंगाने पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन करत दाढीवरुन हात फिरवला. पुढे अकराव्या ओव्हरमध्ये विजय शंकरला बाद केल्यानंतरही त्याने पुष्पा सेलिब्रेशन केले.

Wanindu Hasaranga
Hardik Pandya IPL 2025 : नाव न घेताच हार्दिकचा हिटमॅनवर निशाणा? पराभवाचं कारण सांगत म्हणाला...

चेन्नईची प्लेईंग ११ -

रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), विजय शंकर, रवींद्र जडेजा, एमएस धोनी, आर. अश्विन, जेमी ओव्हरटन, नूर अहमद, अहमद खलील, मथिशा पाथिराणा.

राजस्थानची प्लेईंग ११ -

यशस्वी जेस्वाल, संजू सॅमसंग, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमायर, वनिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महीश थीक्षणा, संदीप शर्मा, तुषार देशपांडे

Wanindu Hasaranga
Maharashtra Kesari : सोलापूरच्या वेताळ शेळकेनं मैदान मारलं! पृथ्वीराज पाटीलला आस्मान दाखवत पटकावली महाराष्ट्र केसरीची गदा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com