shubman gill wicket
shubman gill wickettwitter (x)

IND vs ENG: वोक्सच्या रॉकेट बॉलवर गिलची दांडी गुल! भन्नाट गती पाहून रोहितही झाला शॉक; पाहा Video

Shubman Gill Wicket: या सामन्यात शुभमन गिल स्वस्तात बाद होऊन माघारी परतला आहे.
Published on

Shubman Gill Wicket Video:

लखनऊच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरला आहे.

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत भारतीय संघ पहिल्यांदाच प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरला आहे. दरम्यान सुरुवातीलाच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. शुभमन गिल स्वस्तात बाद होऊन माघारी परतला आहे.

वोक्सच्या गोलंदाजीवर गिलची दांडी गुल.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिलची जोडी मैदानावर आले. गेल्या काही सामन्यांमध्ये या दोन्ही फलंदाजांनी भारतीय संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली आहे. ही जोडी जमणार इतक्यात ख्रिस वोक्सने शुभमन गिलला बाद करत माघारी धाडले.

तर झाले असे की, भारतीय संघाची फलंदाजी सुरु असताना इंग्लंडकडून चौथे षटक टाकण्यासाठी शुभमन गिल गोलंदाजीला आला होता. त्यावेळी शुभमन गिल ९ धावांवर फलंदाजी करत होता.

ओव्हर द विकेटचा मारा करत असलेल्या ख्रिस वोक्सने षटकातील शेवटचा चेंडू ऑफ साइडच्या दिशेने टाकला. या चेंडूवर गिलने स्ट्रेट ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्न फसला कारण चेंडू वळला आणि थेट गिलची दांडी गुल करून गेला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (Latest sports updates)

shubman gill wicket
IND vs ENG Toss: टॉस ठरणार बॉस; इंग्लंडला धुळ चारण्यासाठी टीम इंडियाने प्रथम काय करायला हवं?

या सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

shubman gill wicket
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून रोहित शर्मा बाहेर?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com