भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ लखनऊच्या इकाना स्टेडियमवर आमने सामने येणार आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. भारतीय संघाने सुरुवातीच्या पाचही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
तर इंग्लंडचा संघ वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या वाटेवर आहे. इंग्लंडसाठी हा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण हा सामना गमावल्यास इंग्लंडचा संघ वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडणार आहे.
टॉस ठरणार बॉस..
भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या सामन्यात टॉस अतिशय महत्वाची भूमिका बजावणार आहे. कारण या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळतो. खेळपट्टीवर चेंडू थांबून येतो.
त्यामुळे फलंदाजांना धावा करताना संघर्ष करावा लागतो. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यात फिरकी गोलंदाजांनी धुमाकूळ घातला होता. (Latest sports updates)
या मैदानावर आतापर्यंत १२ सामने खेळवले गेले आहेत. यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने केवळ ३ सामने जिंकले आहेत. तर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने ९ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. त्यामुळे टॉस अतिशय महत्वाचा असणार आहे.
टॉस जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाची सरासरी धावसंख्या २२९ आहे. तर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाची सरासरी धावसंख्या २१३ इतकी आहे.
असे आहेत दोन्ही संघ:
भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन इशान किशन ,सूर्यकुमार यादव.
इंग्लंडचा संघ:
जोस बटलर (कर्णधार आणि यष्टीरक्षक), जो रूट, जॉनी बेयरस्टो (यष्टीरक्षक), हॅरी ब्रुक, लियाम लिविंगस्टोन, डेविड मलान, बेन स्टोक्स, मोइन अली, ख्रिस वोक्स, सॅम करण, डेविड विली, आदिल राशिद, मार्क वुड, रीस टॉपले, गस एटकिंसन
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.