आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेत आज भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार रोहित शर्मा नेट्समध्ये सराव करत असताना दुखापतग्रस्त झाला आहे.
फलंदाजी करत असताना बॉल त्याच्या मनगटाला जाऊन लागला. त्यावेळी तो वेदनेने कळवळताना दिसून आला. गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूने जबरदस्त उसळी घेतली. रोहितला या चेंडूचा अंदाज आला नाही.
भारतीय संघाचा हा सामना लखनऊच्या इकाना स्टेडियमवर रंगणार आहे. त्याची दुखापच पाहता तो या सामन्याला मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. क्रिकेट वेबसाईट इन्साईड स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार तो या सामन्यात खेळताना दिसून येण्याती शक्यता खुप कमी आहे. रोहित शर्मा जर बाहेर झाला तर,हा भारतीय संघाला मोठा धक्का असणार आहे.
वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत दमदार कामगिरी..
रोहित शर्मा वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात शू्न्यावर बाद झाला होता. त्यानंतर पुढील सर्व सामन्यांमध्ये तो चमकला आहे. भारतीय संघ अडचणीत असताना त्याने आक्रमक खेळ करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. आतापर्यंत खेळलेल्या ५ सामन्यांमध्ये त्याने ३११ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १ शतक आणि २ अर्धशतकं झळकावली आहेत. (latest sports updates)
वर्ल्डकप २०२३ स्पर्धेसाठी असे आहेत दोन्ही संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन इशान किशन ,सूर्यकुमार यादव.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.