Rohit Sharma On World Cup: वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर होताच हिटमॅन Action Mode मध्ये! मोठे वक्तव्य करत म्हणाला..

Rohit Sharma Reaction: स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर होताच भारतीय कर्णधार रोहित शर्माचं रिअॅक्शन व्हायरल होऊ लागलं आहे.
rohit sharma
rohit sharmasaam tv
Published On: 

ICC ODI world Cup 2023: क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजेच आयसीसी वनडे वर्ल्ड सुरू व्हायला अवघे ९९ दिवस शिल्लक राहिले आहेत. मंगळवारी (२७ जून) या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

स्पर्धेतील पहिला सामना ५ ऑक्टोबर रोजी गतविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंड या संघांमध्ये रंगणार आहे. तर भारतीय संघाचा पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध रंगणार आहे.

हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर पार पडणार आहे. दरम्यान स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर होताच भारतीय कर्णधार रोहित शर्माचं रिअॅक्शन व्हायरल होऊ लागलं आहे.

rohit sharma
Team India New Captain: वर्ल्ड कपपूर्वी रोहितला मोठा धक्का! Shikhar Dhawan होणार टीम इंडियाचा नवा कर्णधार

याबाबत बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, ' घरच्या मैदानावर वर्ल्ड कप खेळणं एक अविस्मरणीय अनुभव असणार आहे. भारतीय संघाने इथेच १२ वर्षांपूर्वी वर्ल्ड कप जिंकला होता मला माहित आहे की, देशभरातील क्रिकेटप्रेमी आमची मैदानावर उतरण्याची वाट पाहत असणार आहे.'

तसेच तो पुढे म्हणाला की, 'हा वर्ल्ड कप स्पर्धात्मक असणार आहे. कारण आता खेळात खूप बदल झाले आहेत. सर्व संघ आता सकारात्मक होऊन मैदान उतरताना दिसून येत आहेत. हे जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी शुभ संकेत आहेत. येत्या ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात जोरदार सराव करून मैदानात उतरण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.' (Latest sports updates)

rohit sharma
ICC ODI WC 2023 Schedule: लागा तयारीला! ICC वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर; या दिवशी रंगणार भारत- पाकिस्तान सामना

आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत असे आहेत भारतीय संघाचे सामने..

८ ऑक्टोबर - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई

११ ऑक्टोबर - भारत विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली

१५ ऑक्टोबर - भारत विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद

१९ ऑक्टोबर - भारत विरुद्ध बांगलादेश, पुणे

२२ ऑक्टोबर - भारत विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाला

२९ ऑक्टोबर - भारत विरुद्ध इंग्लंड, लखनौ

२ नोव्हेंबर - भारत विरुद्ध क्वालिफायर, मुंबई

५ नोव्हेंबर - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता

११ नोव्हेंबर - भारत विरुद्ध क्वालिफायर, बेंगळुरू (ICC ODI WC 2023 Time Table)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.