Team India New Captain: वर्ल्ड कपपूर्वी रोहितला मोठा धक्का! Shikhar Dhawan होणार टीम इंडियाचा नवा कर्णधार

Shikhar Dhawan: भारतीय संघाचे कर्णधारपद अनुभवी फलंदाज शिखर धवनला दिले जाऊ शकते.
shikhar dhawan
shikhar dhawansaam tv
Published On

Asian Games 2023: भारतीय संघाला यावर्षी अनेक महत्वाच्या स्पर्धा खेळायच्या आहेत. ज्यात आशिया कप आणि आगामी वनडे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेचा समावेश आहे. यासह काही मालिका देखील खेळायचा आहेत.

त्यामुळे भारतीय संघाचे वेळापत्रक व्यस्त असणार आहे. या मालिकांसह भारतीय संघाला आणखी काही महत्वाच्या स्पर्धा देखील खेळायच्या आहेत. त्यामुळे संघातील प्रमुख खेळाडूंना मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते.

shikhar dhawan
Team India: IPL गाजवणाऱ्या खेळाडूची लॉटरी लागली! थेट टीम इंडियात मिळणार संधी, उमेश यादवचही होणार कमबॅक

आशियाई क्रीडा स्पर्धेत शिखर धवनला मिळू शकते मोठी जबाबदारी..

येत्या ऑगस्ट महिन्यात आशिया चषक स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र भारतीय संघाचे सर्व सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. ही स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघ चीनला रवाना होणार आहे. २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान आशियाई क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी बीसीसीआय भारतीय पुरुष आणि महिला संघाची घोषणा करणार आहे.

या संघाचे कर्णधारपद अनुभवी फलंदाज शिखर धवनला दिले जाऊ शकते. यामागचं प्रमुख कारण म्हणजे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी शिखर धवनला भारतीय संघात स्थान मिळणं कठीण आहे. हे पाहता त्याला आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. तर उपकर्णधार म्हणून यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनची निवड केली जाऊ शकते. (Latest sports updates)

shikhar dhawan
ICC ODI WC 2023 Schedule: लागा तयारीला! ICC वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर; या दिवशी रंगणार भारत- पाकिस्तान सामना

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी येत्या ३० जून रोजी भारतीय खेळाडूंची यादी जाहीर केली जाऊ शकते. भारतीय संघ पहिल्यांदाच आशियाई क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. यापूर्वी २०१३ आणि २०१८ मध्ये देखील या स्पर्धेचे आयोजन केले गेले होते.

मात्र त्यावेळी बीसीसीआयने या स्पर्धेसाठी अनुमती दिली नव्हती. यावेळी भारतीय संघातील प्रमुख खेळाडू वर्ल्ड कप खेळताना दिसतील. तर भारतीय संघाची ब तुकडी आशियाई क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी रवाना होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com