Rohit Sharma Retirement : रिटायरमेंटच्या अफवांवर रोहित शर्मानं अखेर मौन सोडलं, नेमकं काय म्हणाला लॉर्ड्स शतकवीर?

rohit sharma retirement rumours response : वनडे क्रिकेटमधून निवृत्तीच्या जोरदार चर्चा सुरू असतानाच, रोहित शर्मानं मौन सोडलं आहे. बाहेर काय चर्चा होतात, त्यामुळे काहीही फरक पडत नाही, असं तो म्हणाला.
रिटायरमेंटची चर्चा, रोहित शर्माचं खणखणीत शतक, सणसणीत उत्तर, नेमका काय म्हणाला?
rohit sharma retirement rumours response saam tv
Published On

निवृत्तीच्या चर्चांनंतर प्रचंड दबाव घेऊन लॉर्ड्सच्या मैदानावर शड्डू ठोकणारा शतकवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) यानं अखेर मौन सोडलं आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर शतक ठोकून 'अजूनही वादळ थांबलेलं नाही' हे दर्शवून देणाऱ्या रोहितनं टीकाकारांना उत्तुंग षटकार ठोकला आहे. गोंगाट होत आहे तर होऊ द्या, तरच मजा आहे, असं तो म्हणाला.

इंग्लंडच्या विरुद्ध रविवारी लॉर्ड्सच्या मैदानावर तिसरा आणि अखेरचा वनडे सामना झाला. रोहित शर्मानं इंग्लंडच्या डोंगराएवढ्या धावांचा पाठलाग करताना, दबावातही १३८ धावांची स्फोटक खेळी केली. लॉर्ड्सच्या मैदानावर ऐतिहासिक शतकी खेळी करणाऱ्या रोहितनं दुसऱ्या वनडे सामन्यापासून सुरू झालेल्या निवृत्तीच्या चर्चांवर मौन सोडलंय. रोहित शर्मा तिसऱ्या वनडेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होईल, अशा चर्चांचं वादळ सुटलं होतं. हे वादळ थोपवण्याचं काम त्यानं बॅटच्या माध्यमातून केलं आहे. माझं संपूर्ण लक्ष हे भारतीय क्रिकेट संघासाठी चांगली कामगिरी करण्यावर आहे, असे संकेत रोहितने सामना संपल्यावर दिले आहेत.

निवृत्तीच्या चर्चांवर रोहित शर्मानं आपल्या नेहमीच्या शैलीत उत्तर दिलं आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या वतीनं रोहितच्या मुलाखतीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यात त्यानं निवृत्तीच्या चर्चांवर रोखठोक उत्तरे दिली आहेत. मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करणे या एकाच गोष्टीवर संपूर्ण करिअरमध्ये लक्ष केंद्रीत केलं आहे. बाहेर काय बोललं जातं, काय चर्चा सुरू आहेत, याला मी महत्व देत नाही, असे तो म्हणाला.

माझं काम फलंदाजी करणे आहे. मैदानावर उतरायचं आणि आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणे आणि संघासाठी खेळणं हेच माझे काम आहे. माझ्या पदार्पणावेळीच मला जी जबाबदारी दिली आहे, ती मी करत राहील, असे तो स्पष्टपणे म्हणाला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आल्यापासून माझ्याबाबतीत वेगवेगळ्या चर्चा होत राहिल्या आहेत. कधी फॉर्मवर, तर कधी कर्णधारपदावर, तर कधी माझ्या करिअरच्या भविष्यावर. पण बाहेर होणाऱ्या चर्चांना माझ्या कामगिरीवर, खेळावर कधीच परिणाम होऊ दिला नाही, असेही त्याने सांगितले.

मी जेव्हा पदार्पण केलं, तेव्हापासूनच अशा प्रकारचा गोंगाट होत आहे. मी जोपर्यंत इथे आहे, तोपर्यंत तो होतच राहील. मला काहीही फरक पडत नाही. मैदानावर मी काय करतो, संघाच्या यशात माझं योगदान किती आहे, हे माझ्यासाठी महत्वाचे आहे. सध्या तरी माझं या सर्वावर लक्ष केंद्रीत आहे, असे सांगून त्यानं टीकाकारांचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला.

अशा प्रकारच्या चर्चा हा क्रिकेटचा भाग आहे. गोंगाट होऊ द्या. जर गोंगाट नाही झाला तर मजा पण येणार नाही. माझं काम मैदानावर आहे. बाहेर काय बोललं जातं, ते इतरांचं काम आहे. मी तर याकडे याच नजरेतून बघतो, असेही तो म्हणाला. दरम्यान, रोहितने टीकाकारांना लॉर्ड्सच्या मैदानावर आपल्या बॅटनंही उत्तर दिलं आहे. इंग्लंडने ३८८ धावांचं आव्हान दिले होते. त्याचा पाठलाग करताना रोहितने शतक ठोकले. वनडे कारकिर्दीतले हे त्याचे ३४ वे शतक होते. मात्र, रोहितचं शतक व्यर्थ गेले. भारताला पराभूत व्हावे लागले. तसेच भारताने ही मालिका २-१ ने गमावली.

रिटायरमेंटची चर्चा, रोहित शर्माचं खणखणीत शतक, सणसणीत उत्तर, नेमका काय म्हणाला?
IND vs ENG: रोहितचे शतक व्यर्थ; अवघ्या ८ चेंडूंमध्ये सामन्याचा निकाल बदलला; आठ वर्षांनंतर इंग्लंडनं मालिका जिंकली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com