Riyan Parag Vaping Fine : ड्रेसिंग रूममध्ये 'धूर' काढणाऱ्या रियान परागवर मोठी कारवाई

riyan parag vaping fine ipl dressing room action : ड्रेसिंग रूममध्ये बसून ई-सिगारेट ओढणारा राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
रियान परागवर मोठी कारवाई
Riyan Parag vaping in dressing Roomsocial media
Published On

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग याच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. ड्रेसिंग रुममध्ये बसून वेपिंग करणाऱ्या रियानच्या सामन्याच्या मानधनातील २५ टक्के रक्कम दंड वसूल करण्यात आली आहे. आयपीएलचा ४० वा सामना पंजाब किंग्जविरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झाला होता. त्यावेळी दुसरी इनिंग सुरू असताना ड्रेसिंग रुममध्ये बसून ई-सिगारेट ओढत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्याच्यावर टीकेची झोड झाली होती.

आयपीएलच्या आचारसंहितेच्या लेव्हल १ चे उल्लंघन केल्याप्रकरणी रियान परागला दोषी ठरवण्यात आले आहे. तसेच त्याच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंट जोडण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडूनही त्याच्यावर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येत असून, तसा विचार केला जात आहे. आयपीएलची प्रतिष्ठा राखण्यासाठी बीसीसीआय चूक करणारा संघ, अधिकारी आणि खेळाडूंविरोधात कारवाई करण्यासाठी दुसऱ्या पर्यायांचा विचार केला जात आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

रियान परागला चूक मान्य

रियान परागला आयपीएल आचारसंहितेच्या अनुच्छेद २.२१ चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. सामन्याच्या दुसऱ्या डावात वेपिंग (ई-सिगारेटचा वापर करणे) करताना आढळून आला होता. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरून रियान परागवर सोशल मीडियावर टीकेची झोड उठली होती. रियान परागने आपली चूक मान्य केली आहे.

रियान परागवर मोठी कारवाई
Riyan Parag RR Vs CSK : रियान परागला 'ती' चूक नडली! सामना जिंकूनही BCCI ची मोठी कारवाई

सामनाधिकाऱ्यांनी दिलेली शिक्षा मान्य असल्याचे रियान परागने म्हटले आहे. दरम्यान, भारत सरकारने २०१९ मध्ये ई-सिगारेटवर बंदी घातली आहे. उत्पादन, विक्री आणि वितरणावर बंदी घालण्यात आली होती. यासंबंधी कायद्यानुसार, पहिल्यांदा असा गुन्हा केला तर, त्यात दोषी आढळल्यास एक वर्षे शिक्षा किंवा एक लाख रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते.

रियान परागवर मोठी कारवाई
Riyan Parag: OUT की NOT OUT...! बाद झाल्यानंतर थेट अंपायरशी भिडला रियान पराग, अहमदाबादच्या मैदानात मोठा ड्रामा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com