RR vs DC: रियान परागने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रचला इतिहास; अशी कामगिरी करणारा सर्वात तरुण भारतीय

Riyan Parag IPL 2024: दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध तुफानी खेळी करणाऱ्या रियान परागने आणखी एक इतिहास रचला आहे. त्याने आपल्या संघाचा कर्णधार संजू सॅमसनसह, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन आणि ऋषभ पंतचा रेकॉर्ड मोडला आहे.
Riyan Parag IPL 2024
Riyan Parag IPL 2024IPL Twitter
Published On

Riyan Parag Created History

आयपीएल २०२४ चा नववा सामना गुरुवारी राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या या सामन्यात राजस्थानने १२ धावांनी विजय मिळवला. रियान पराग हा राजस्थानच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने ४५ चेंडूत ८४ धावांची धडाकेबाज खेळी केली. यंदाच्या आयपीएल हंगामातील राजस्थानचा हा सलग दुसरा विजय आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Riyan Parag IPL 2024
DC vs RR: अखेरच्या षटकात आवेशने पालटली बाजी; दिल्लीच्या संघाचा १२ धावांनी पराभव

तर दिल्ली कॅपिटल्स संघाला पराभवाचे सलग दोन धक्के बसले आहे. दरम्यान, या सामन्यात तुफानी खेळी करणाऱ्या रियान परागने आणखी एक इतिहास रचला आहे. त्याने आपल्या संघाचा कर्णधार संजू सॅमसनसह, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन आणि ऋषभ पंतचा रेकॉर्ड मोडला आहे.  (Latest Marathi News)

आसामच्या या फलंदाजाने यंदाच्या आयपीएल हंगामातील पहिल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या ४३ धावांची जबरदस्त खेळी केली होती. मात्र. त्याचे अर्धशतक ७ धावांनी हुकले होते. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात त्याने ८४ धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत परागने ७ चौकार आणि ६ षटकार लगावले.

रियान परागच्या आयपीएल कारकिर्दीतील हे तिसरे अर्धशतक ठरले. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये ५६ सामने खेळले आहेत. मात्र, तरी देखील रियानने संजू सॅमसनचा रेकॉर्ड मोडला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये १०० टी-२० सामने खेळणारा तो सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला आहे.

रियानने २२ वर्षे आणि १३९ दिवसांच्या वयात १०० वा टी-20 सामना खेळला आहे. याआधी हा रेकॉर्ड राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनच्या नावावर होता. संजूने २२ वर्षे आणि १५७ दिवसांच्या वयात १०० वा सामना खेळला. या यादीत वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन आणि ऋषभ पंत यांचीही नावे आहेत.

Riyan Parag IPL 2024
IPL 2024, MI vr SRH: हार्दिक पांड्याने पराभवाचे खापर कोणाच्या माथी फोडले? सामन्यानंतर कर्णधार म्हणाला, वाचा...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com