DC vs RR: अखेरच्या षटकात आवेशने पालटली बाजी; दिल्लीच्या संघाचा १२ धावांनी पराभव

Delhi Capitals vs Rajasthan Royals : आयपीएल २०२४ चा ९ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झाला. या ९ व्या सामन्यात परत एकदा घरच्या मैदानात खेळणाऱ्या संघाने विजय मिळवलाय.
DC vs RR: अखेरच्या षटकात आवेशने पालटली बाजी; दिल्लीच्या संघाचा १२ धावांनी पराभव

Delhi Capitals vs Rajasthan Royals IPl 2024 :

आयपीएल १७ व्या हंगामात परत एका संघाने आपल्या होम ग्राउंडवर विजय मिळवलाय. आतापर्यंत झालेल्या सामन्यात ९ संघांनी आपल्या घरच्या मैदानात विजय मिळवलाय. परागची फलंदाजी आणि संदीप, आवेश खानच्या शानदार गोलंदाजीने राजस्थानमध्ये दिल्लीचं पानीपत झालं. अखेरच्या दोन षटकात शानदार गोलंदाजी करत राजस्थानच्या संघाने १२ धावांनी विजय मिळवलाय. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. (Latest News)

दिल्लीचा संघ राजस्थान रॉयल्सच्या संघाने दिलेलं आव्हान पार करण्याच्या जवळ होता. परंतु आवेश खानने दिल्लीचा सर्व खेळ उलटून लावला. दिल्लीचं सामना जिंकण्याचं स्वप्न अखेरच्या षटकात भंग झालं. राजस्थानने रॉयल्स संघाने दिल्ली कॅपिटल्सला १२ धावांनी पराभव केला. यंदाच्या आयपीएलमधील हा नववा सामना आहे , ज्यात यजमान संघानेच सामना जिंकलाय.

आयपीएल २०२४ चा नववा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात जयपूरमध्ये खेळला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या राजस्थान रॉयल्सची सुरुवात खराब झाली. संघाने १० षटकांत ३ बाद फक्त ५८ धावा केल्या होत्या. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रियान पराग याने राजस्थानच्या डावाची धुरा सांभाळली आणि संघाला एक सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये आसामकडून खेळणाऱ्या रियान परागने गुरुवारी आपल्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी खेळली. त्याने ४५ चेंडूत ८४ धावा केल्या. परागने या खेळीत ७ चौकार आणि ६ षटकार मारले. या काळात रियान परागला रविचंद्रन अश्विन (२९), ध्रुव जुरेल (२०) आणि शिमरन हेटमायर (१४) यांची चांगली साथ लाभली.

DC vs RR: अखेरच्या षटकात आवेशने पालटली बाजी; दिल्लीच्या संघाचा १२ धावांनी पराभव
RR vs DC : परागची नाबाद ८५ धावांची तडाखेबाज खेळी; दिल्ली कॅपिटल्ससमोर १८६ धावांचे आव्हान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com