RR vs DC : परागची नाबाद ८५ धावांची तडाखेबाज खेळी; दिल्ली कॅपिटल्ससमोर १८६ धावांचे आव्हान

Rajasthan Royals vs Delhi Capitals : इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२४चा ९ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जात आहे.
RR vs DC : परागची नाबाद ८५ धावांची तडाखेबाज खेळी; दिल्ली कॅपिटल्ससमोर १८६ धावांचे आव्हान

Rajasthan Royals vs Delhi Capitals RR Score 185 Runs:

इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२४ चा ९ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जात आहे.दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. दिल्लीच्या गोलंदाजांनी १० षटकापर्यंत दिल्लीच्या धावासंख्या रोखून ठेवली होती परंतु परागच्या 'रॉयल' खेळीने दिल्लीचं टेन्शन वाढवलं. (Latest News)

परागने अखेरच्या २१ चेंडूमध्ये परागने तब्बल ६० धावा ठोकल्या. परागने चमकदार कामिगरी केली. त्याने ४५ चेंडू ८४ धावा केल्या यात ७ चौकार आणि ६ षटकाराचा समावेश आहे.डावात आर अश्विनची फटकेबाजी पाहायला मिळाली. नेहमी आपल्या फिरकीने फंलंदाजां बाद करणाऱ्या अश्विने आज कमालीच फलंदाजी केली. अश्विनने ३ षटकार लगावत १८५ धावांच्या आव्हानात २९ धावांचे योगदान दिलं.

दिल्लीने नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे निमंत्रण दिलं.दिल्लीची गोलंदाजी आणि १०० वा टी२० सामना खेळणारा ऋषभ पंतच्या कॅप्टनशीपने योग्य १० षटकापर्यंत डावाला चांगला आकार दिला. प्रथम फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारण्याची संधी राजस्थानकडे होती. परंतु दिल्लीच्या गोलंदाजांनी स्टम्प टू स्टम्प चेंडू टाकत राजस्थानच्या खेळाडूंना बांधून ठेवलं होतं.

परंतु परागने राजस्थानला या बंधातून मुक्त करत दिल्लीच्या फंलदाजांचा चांगलाच समाचार घेतला. परागने ४५ चेंडूत ८४ धावा केल्या. यात ६ षटकार आणि ७ चौकारांचा समावेश आहे. त्यांच्या तडाखेबाजी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने ५ विकेट गमावत १८५ धावा केल्या. यात फिरकीपटू आर अश्विननची मोठं योगदान दिलं. अश्विनने २९ धावा केल्या, यात ३ षटकाराचा समावेश आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com