IPL 2024, MI vr SRH: हार्दिक पांड्याने पराभवाचे खापर कोणाच्या माथी फोडले? सामन्यानंतर कर्णधार म्हणाला, वाचा...

IPL 2024 Match, Mumbai Indians vr SRH News in Marathi: हार्दिक पांड्याने पराभवाचं खापर मुंबईच्या फलंदाजांवर फोडलं आहे. २७७ धावांचा पाठलाग करताना सलामीवीर रोहित शर्मा आणि इशान किशनने संघाला चांगली सुरुवात करुन दिली होती. पण इतर खेळाडूंनी याचा चांगला फायदा घेतला नाही, असं हार्दिक पांड्याने म्हटलं.
MI vr SRH IPL 2024 Match
MI vr SRH IPL 2024 MatchSaam TV

Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad

आयपीएल २०२४ मधील आठवा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद संघात झाला. राजीव गांधी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात हैदराबादने मुंबईचा ३१ धावांनी दारुण पराभव केला. या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे. हार्दिकने गोलंदाजीवेळी घेतलेले चुकीचे निर्णय त्यानंतर संथ गतीने केली फलंदाजी यामुळेच मुंबईचा पराभव झाला, असं चाहते म्हणत आहेत. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

MI vr SRH IPL 2024 Match
SRH vs MI: हैदराबादच्या खेळाडूंकडून दमदार खेळ; मुंबईचा ३१ धावांनी पराभव

विरोधी संघाने १०० धावा कुटल्या, तरी देखील पांड्याने बुमराहला गोलंदाजीसाठी का आणले नाही? असं म्हणत क्रीडाप्रेमी हार्दिक पांड्यावर टीका करत आहेत. दुसरीकडे हार्दिक पांड्याने पराभवाचं खापर मुंबईच्या फलंदाजांवर फोडलं आहे. २७७ धावांचा पाठलाग करताना सलामीवीर रोहित शर्मा आणि इशान किशनने संघाला चांगली सुरुवात करुन दिली होती. पण इतर खेळाडूंनी याचा चांगला फायदा घेतला नाही, असं हार्दिक पांड्याने म्हटलं.

नाणेफेक जिंकल्यानंतर हैदराबाद संघ २७७ धावा करेल असं वाटलं होतं का? असा प्रश्न समालोचकांनी हार्दिक पांड्याला विचारला. यावर बोलताना पांड्या म्हणाला, "खरंच नाही, विकेट चांगलं होतं, तुम्ही कितीही वाईट किंवा चांगली गोलंदाजी केली, तरी विरोधी संघाने जर २७७ धावा केल्या तर त्यांनी खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारे फलंदाजी केली आहे".

MI vr SRH IPL 2024 Match
Fastest 50 in IPL: हैदराबादमध्ये आलं धावांचं वादळ;अभिषेक शर्माने झळकावले सर्वात जलद अर्धशतक

हैदराबादचं विकेट चांगलं असल्यामुळे गोलंदाजांसाठी कठीणच होतं. आम्ही काही गोष्टी इकडे तिकडे करू शकलो असतो. आमच्याकडे आक्रमक तरुण गोलंदाजी असून या पराभवातून आम्ही शिकून पुढे जाऊ, असंही हार्दिक पांड्याने सांगितलं.

त्याचबरोबर स्टेडियममध्ये बॉल गेल्यानंतर फॅन्स तो लवकर परत देत नाहीत. त्यामुळे ओव्हर पूर्ण करायला वेळ लागतो, अशी खंतही हार्दिक पांड्याने बोलून दाखवली. पदार्पणवीर मफाकाने पहिल्यांदा इतक्या क्राऊडसमोर खेळला, त्याला आणखी वेळ द्यायला हवा त्याच्याकडे चांगल्या प्रकारचं स्किल आहे, असंही पांड्या म्हणाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com