Rishabh Pant IPL 2023 : भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याचा ३० डिसेंबर रोजी भीषण अपघात झाला. दिल्लीहून रुरकी येथे जात असताना, पंतचे अचानक कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात पंतला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. दरम्यान, ऋषभ पंत आयपीएल खेळणार की नाही? याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. (Sports News)
अपघातात ऋषभ पंतच्या उजव्या पायाच्या लिगामेंटवर ६ जानेवारीला यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याला मैदानात परतण्यासाठी 6 महिने लागू शकतात, असे मानले जात आहे. अशा परिस्थितीत त्याच्या आयपीएल 2023 मध्ये खेळण्याबाबत साशंकता होती. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आता पंत आयपीएलमध्ये खेळणार की नाही हे स्पष्ट केले आहे.
कोलकात्यात माध्यमांशी बोलताना गांगुली म्हणाले, ऋषभ पंतला सावरायला वेळ लागेल. त्यामुळे तो आयपीएल 2023 मध्ये सहभागी होऊ शकणार नाही. त्याची उणीव संघाला नेहमीच भासेल. ऋषभ फक्त 23 वर्षांचा आहे आणि त्याच्याकडे भरपूर वेळ आहे. पंतच्या गैरहजेरीत दिल्लीचा कर्णधार कोण असेल या प्रश्नावर ते म्हणाले, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
दरम्यान, ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नर दिल्लीचे कर्णधारपद भूषवणार का? असा प्रश्न गांगुलीला विचारला असता, अद्याप काहीही ठरलेले नाही. याबाबत लवकरच घोषणा होणार आहे, असं गांगुलीने सांगितलं आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर तीन महिन्यांनी सौरव गांगुली क्रिकेटमध्ये परतले आहेत. (Rishabh Pant Car Accident)
दिल्ली कॅपिटल्सने त्यांना त्यांच्या संघाचे क्रिकेट संचालक बनवले आहे. गांगुली 2019 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे मार्गदर्शक देखील होते. त्यानंतर ते बीसीसीआयचे अध्यक्ष झाले. दिल्ली कॅपिटल्स व्यतिरिक्त, सौरव ILT20 संघ दुबई कॅपिटल्स आणि दक्षिण आफ्रिकन T20 लीग संघ प्रिटोरिया कॅपिटल्सशी या फ्रँचायझीशी संबंधित काम पाहणार आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.