IND vs SL 1st ODI: टीम इंडियाचा श्रीलंकेवर 67 धावांनी दणदणीत विजय; मालिकेत 1-0 ने आघाडी

विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी
Team India
Team IndiaSaam TV

IND vs SL 1st ODI: टीम इंडियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला आहे. टीम इंडियाने 67 धावांनी सामना जिंकला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 373 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ आठ गडी गमावून केवळ 306 धावा करू शकला आणि 67 धावांनी सामना गमावला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. (Sports News)

टॉस गमावून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताने चांगली सुरुवात केली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या सलामीच्या जोडीने शतकी भागीदारी केली. गिल 70 आणि रोहित 83 धावा करून बाद झाला. यानंतर विराट कोहलीने 113 धावा केल्या. या तिन्ही फलंदाजांच्या शानदार योगदानामुळे भारताने 373 धावांची मोठी धावसंख्या उभारली.

Team India
Virat Kohli Century: दोघांचे हुकले पण कोहलीने ठोकले! विराटची लंकेविरुद्ध शतकी खेळी, 73 वे शतक; 4 वर्षांचा दुष्काळ संपला

प्रत्युत्तरात श्रीलंकेची सुरुवात अत्यंत खराब झाली. पॉवरप्लेमध्ये दोन गडी गमावल्यानंतर श्रीलंकेला पुनरागमन करणे कठीण झाले. श्रीलंकेकडून दासुन शनाकाने 108 धावांची नाबाद खेळी केली. पथूम निशांकने सर्वाधिक 72, धनंजय डिसिल्वाने 47 धावा केल्या.

भारताकडून उमरान मलिकने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर मोहम्मद सिराजने दोन तर शमी, पांड्या, चहलने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. या मालिकेतील दुसरा सामना 12 जानेवारी रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होणार आहे.

Team India
Ind Vs SL ODI Series: हिटमॅनने श्रीलंकन गोलंदाजांची केली जोरदार धुलाई, शतक मात्र हुकले; विराटचेही अर्धशतक

विराटचं साजरं केलं 45वं शतक

 विराट कोहलीने वनडे कारकिर्दीतील 45 वे शतक पूर्ण केले आहे.तर आंतरराष्ट्रीय कारकिर्दितील हे त्याचं 73 शतक ठरलं. त्याने 80 चेंडूत 100 धावा पूर्ण केल्या.

विराट कोहलीशिवाय रोहित शर्मा  (Rohit Sharma) आणि शुभमन गिल यांनी उत्कृष्ट खेळी खेळली. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 143 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. हिटमॅन रोहितने 67 चेंडूत 83 धावा केल्या तर शुभमन गिलने 60 चेंडूत 70 धावांचे योगदान दिले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com