Virat Kohli Century: दोघांचे हुकले पण कोहलीने ठोकले! विराटची लंकेविरुद्ध शतकी खेळी, 73 वे शतक; 4 वर्षांचा दुष्काळ संपला

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपली. विराटने लंकन गोलंदाजांची जोरदार धुलाई करत सामन्यात शतक साजरे केले.
virat Kohali 73rd International Century
virat Kohali 73rd International CenturySaamtv

Ind Vs Srilanka ODI Siries: भारत आणि श्रीलंका (Srilanka) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपली. विराटने लंकन गोलंदाजांची जोरदार धुलाई करत सामन्यात शतक साजरे केले. विराटचे हे ७३ वे आंतराष्ट्रीय तर ४५ वे एकदिवसीय शतक ठरले.

virat Kohali 73rd International Century
Ind Vs SL ODI Siries: हिटमॅनने श्रीलंकन गोलंदाजांची केली जोरदार धुलाई, शतक मात्र हुकले; विराटचेही अर्धशतक

या शतकासोबतच विराटने (Virat Kohli) चार वर्षाचा दुष्काळही संपला आहे. चार वर्षांपासून विराटने एकदिवसीय सामन्यांत एकही शतक झळकावले नव्हते. त्याने २०१९ मध्ये रांजीत त्याचे शेवटचे शतक झळकावले होते.

virat Kohali 73rd International Century
Maharashtra Politics : बायकोच्या जीवावर राजकारण; देशमुखांच्या टोमण्याला राणांचं उत्तर; म्हणाले, पापाचा घडा भरलाय!

श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यात विराटने ८० चेंडूंमध्ये त्याचे शानदार शतक साजरे केले. या खेळीसोबतच विराटने त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये तो आल्याचे संकेत दिले आहेत. विराटच्या या शतकाच्या आणि रोहित शर्माच्या (Rohit Sharma) अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने श्रीलंकेसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. भारतीय संघाने सात गडी गमावत ३६६ धावा ठोकल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com