Viral Video: मैदानात रडणाऱ्या छोट्या फॅनकडे पोहोचला रोहित, त्यानंतर पुढे जे झालं ते पाहून तुम्हीही रोहितचे फॅन व्हाल!

स्टेडियममध्ये रडत असलेल्या एका छोट्या फॅनला शांत करताना रोहित दिसत आहे.
Rohit Sharma
Rohit SharmaViral Video

Rohit Sharma Video Viral: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. दोन्ही संघामधील पहिला सामना गुवाहाटी येथे होणार आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माही श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेतून फीट होऊन संघात परतला आहे.

सामन्यापूर्वी रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. स्टेडियममध्ये रडत असलेल्या एका छोट्या फॅनला शांत करताना रोहित दिसत आहे.

Rohit Sharma
Ind Vs SL ODI Siries: खोऱ्याने धावा, जबरदस्त फॉर्म, तरीही सुर्यकुमार ODI मालिकेतून बाहेर, काय आहे कारण?

प्रॅक्टिस सेशन दरम्यानचा हा व्हिडीओ आहे. प्रॅक्टिसदरम्यान काही फॅन्सला रोहित शर्माला भेटून त्याच्यासोबत सेल्फी घ्यायचा होता. मात्र रोहितला प्रत्येक फॅनसोबत सेल्फी घेणे शक्य नाही. मात्र तेथे उपस्थित एक छोटा फॅन रडताना रोहितला दिसला.

त्यावेळी रोहित स्वत: त्याच्याकडे पोहोचला. रोहित त्या रडणाऱ्या मुलाला शांत करताना दिसला. रोहित त्या मुलाचे गाल प्रेमाने ओढतानाही दिसत आहे. यावेळी रोहितने त्या मुलाची काय रडतोयस अशी विचारपूसही केली. तसेच त्याचे गाल ओढून त्याचं कौतुकही केलं.

Rohit Sharma
Ind Vs SL ODI Siries: नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने, सुर्यकुमारला संधी नाही, अशी आहे Team India ची प्लेईंग 11

यानंतर रोहितचा छोटा फॅन शांत झाला आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू देखील फुललं. रोहितने त्यानतंर त्याच्यासोबत सेल्फी देखील घेताना. रोहितचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.टीम इंडियाच्या स्टार प्लेअर त्याच्या चाहत्यांसोबत किती प्रेमाने वागतोय याबाबत रोहितचं सर्वत्र कौतुक होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com