भारताचा 'हा' खेळाडू होणार टेस्ट क्रिकेटचा कर्णधार? युवराज सिंगनं दिली प्रतिक्रिया

yuvraj singh
yuvraj singh- Saav Tv
Published On: 

मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये भारताचा आक्रमक फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतने (Rishabh Pant) क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केलीय. टीम इंडियाचा (Indian cricket team) युवा फलंदाज ऋषभ पंतला भविष्यात टेस्ट क्रिकेटचा कर्णधार (Test cricket captain) करण्यासाठी तयार केले पाहिजे. ऋषभ पंत टेस्ट क्रिकेटचा कर्णधार होण्यासाठी योग्य खेळाडू आहे. त्यामुळे टेस्ट क्रिकेटच्या फॉर्मेटमध्ये ऋषभ पंत भारताचा कर्णधार होऊ शकतो. असं सल्ला भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने (Yuvraj singh) बीसीसीआयला (BCCI) दिला आहे.

yuvraj singh
टीम इंडियानंतर आता IPLमधूनही हा अनुभवी क्रिकेटपटू आऊट

युवराज सिंगने बीसीसीआयला दिला सल्ला

२४ वर्षीय ऋषभ पंतने गेल्या काही वर्षांमध्ये क्रिकेटच्या कामगिरीत खूप सुधारणा केली आहे. टीम इंडियाचा युवा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतला भविष्यात टेस्ट क्रिकेटचा कर्णधार करण्यासाठी तयार केले पाहिजे. असा सल्ला युवराजने बीसीसीआयला दिला आहे. दरम्यान, भारतीय टेस्ट क्रिकेटमध्ये २०१८ मध्ये ऋषभ पंतने पदार्पण केलं. पंतने ३० सामन्यांत ४५.८५ च्या सरासरीनं १९२० धावा केल्या आहेत. यामध्ये चार शतक आणि नऊ अर्धशतकांचा समावेश आहे. विकेट किपिंगमध्ये पंतने १०७ झेल घेतल्या असून ११ स्टपिंगही केल्या आहेत.

गेल्या वर्षी २०२१ मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेट संघात नव्या कर्णधारची वर्णी लावण्यासाठी बीसीसीआयमध्ये खलबतं झाली. विराट कोहलीने टी-२० विश्वचषक सुरु होण्याआधीच आयपीएलच्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर टी-२० मध्येही भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व कोहली सोडणार असल्याच्या बातम्या झळकल्या. त्यानंतर टी-२० फॉर्मेटमध्येही कोहलीने कर्णधार पदाचा राजीनाम दिला.

yuvraj singh
पंजाब किंग्जच्या वेगवान गोलंदाजाची टीम इंडियात होणार निवड ? रवी शास्त्री म्हणाले...

त्यानंतर भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला कर्णधार पदाची सुत्रे सोपवण्यात आली. कालांतराने वन डे क्रिकेट फॉर्मेट आणि टेस्ट मध्येही विराट कोहलीला कर्णधार पद सोडावं लागलं. त्यानंतर टी-२०, वनडे आणि टेस्ट या तिन्ही फॉर्मेटमध्ये रोहित शर्माकडे कर्णधार पदाची जबाबदारी सोपवली. त्यानंतर रोहितच्या नेतृत्वात भारताने सलग १२ सामन्यांमध्ये विजय मिळवला.

ऋषभ पंत होणार भारताचा कर्णधार ?

जर ऋषभ पंतकडे भविष्यात भारतीय संघाचा टेस्ट क्रिकेटचा कर्णधार म्हणून पाहत असाल तर त्याला पुरेसा वेळ द्या. सहा महिन्यात किंवा एक वर्षात त्याच्याकडून रिझल्टची अपेक्षा करु नका. चांगल कामासाठी युवा खेळाडूंवर विश्वास ठेवला पाहिजे. भारतीय संघाची मॅनेजमेंट टीम ऋषभ पंतबाबत काय विचार करणार आहे, हे मला माहित नाही. पण टेस्ट क्रिकेटसाठी ऋषभ पंत योग्य खेळाडू आहे. असं मत युवराज सिंगने व्यक्त केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.