पंजाब किंग्जच्या वेगवान गोलंदाजाची टीम इंडियात होणार निवड ? रवी शास्त्री म्हणाले...

Arshdeep singh
Arshdeep singh google
Published On: 

मुंबई : आयपीएलच्या १५ व्या मोसमात (IPL 2022) तरुण तडफदार युवा खेळाडूंची मेगा ऑक्शनमध्ये कोट्यावधी रुपयांची बोली लावून विविध संघांनी विकत घेतले. त्यानंतर आयपीएलच्या सामन्यांची रणधुमाळी सुरु झाल्यानंतर युवा खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी दर्शवण्यासाठी कंबर कसली. संघांमध्ये दाखल झालेले नवखे खेळाडू सामना जिंकवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. असाच एक गुणवंत खेळाडू पंजाब किंग्ज (Punjab kings) संघामध्ये खेळत आहे. अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) असं या खेळाडूचं नाव आहे. अर्शदीपने भेदक गोलंदाजी करत आयपीएलमध्ये त्याच्या कौशल्यांची चुणूक दाखवून दिलीय. त्यामुळे संपूर्ण क्रिकेटविश्वात अर्शदीपची चर्चा रंगली आहे. आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या गोलंदाजांची भारतीय क्रिकेट संघात (Indian cricket Team) निवड होण्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी माध्यमांशी बोलताना मत व्यक्त केलं आहे. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगची भारतीय क्रिकेट संघात निवड होऊ शकते, असं रवी शास्त्री माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले आहेत.

डावखुरा गोलंदाज अर्शदीप सिंग आयपीएलच्या गेल्या तीन सत्रांपासून अप्रतिम कामगिरी करत आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघात टी-२० स्कॉडमध्ये अर्शदीपचं निश्चित केली जाण्याची शक्यता आहे. अर्शदीप बद्दल बोलताना रवी शास्त्री म्हणतात, सामन्यांमध्ये दबावाच्या परिस्थितीतही अर्शदीप उत्तम गोलंदाजी करतो. २३ वर्षीय अर्शदीपने २०१९ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. गेल्या काही वर्षांपासून अर्शदीप पंजाब किंग्जसाठी मोलाची कामगिरी करत आहे. आयपीएलच्या लिलावापूर्वीच पंजाबने दोन खेळाडूंचा समावेश केला होता. त्यामध्ये अर्शदीप सिंग या खेळाडूचंही नाव होतं. अर्शदीपने नव्या चेंडूने गोलंदाजी करत त्याच्या कामगिरीत सुधारणा केली. त्यामुळे शेवटच्या षटकांमध्येही अर्शदीप उत्तम गोलंदाजी करत आहे.

Arshdeep singh
चर्चा तर होणारच! क्रिकेट स्पर्धेत बक्षीस म्हणून मानाचा बोकड आणि कोंबडा-कोंबडी

उमरान मलिक आणि तिलक वर्माचंही नाव चर्चेत

आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगची चर्चा तर आहेच. पण सनरायजर्स हैद्राबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक आणि मुंबई इंडियन्सचा फलंदाज तिलक वर्मा या खेळाडूंनीही दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे उमरान आणि तिलकलाही भविष्यात भारतीय क्रिकेट संघात खेळण्यचाी संधी मिळू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.