चर्चा तर होणारच! क्रिकेट स्पर्धेत बक्षीस म्हणून मानाचा बोकड आणि कोंबडा-कोंबडी

चरण प्रीमियर लीगमधील अनोख्या बक्षिसाची शिराळा तालुक्यात जोरदार चर्चा..
चर्चा तर होणारच! क्रिकेट स्पर्धेत बक्षीस म्हणून मानाचा बोकड आणि कोंबडा-कोंबडी
चर्चा तर होणारच! क्रिकेट स्पर्धेत बक्षीस म्हणून मानाचा बोकड आणि कोंबडा-कोंबडीSaamTVNews
Published On: 

सांगली : आज पर्यंत आपण अनेक क्रिकेट स्पर्धा पाहिल्या त्यामध्ये ट्रॉफी, रक्कम विजेत्याला दिली जाते. पण, सांगली (Sangli) जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चरण गावात (Charangaon) एका अजब गजब बक्षिसाची चर्चा सुरू आहे. ती म्हणजे प्रथम क्रमांकासाठी एक मानाचा बोकड (Male Goat) तर द्वितीय क्रमांकासाठी पाच कोंबडे (Hens) आणि तृतीय क्रमांकासाठी पाच कोंबड्या ठेवल्या आहेत. या बक्षिसाची तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे.

हे देखील पाहा :

शिराळा (Shirala) तालुक्यातील चरण गावात चरण प्रीमियर लीग आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत फक्त गावातील संघ निवडले जातात. यावर्षी स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे.. मात्र तरुणांनी अजब बक्षीस ठेवल्याने परिसरात चर्चेचा विषय झाला आहे. ही स्पर्धा (Competition) 7 मे आणि 8 मे रोजी पार पडणार आहे. पण, त्याची उत्सुकता लागून राहिली आहे.

चर्चा तर होणारच! क्रिकेट स्पर्धेत बक्षीस म्हणून मानाचा बोकड आणि कोंबडा-कोंबडी
राज्याच्या उपराजधानीत पाणीटंचाई; शहरात टँकर माफिया सक्रिय

चरण प्रीमियर लीग हा एक जिव्हाळ्याचा विषय असं समजून तरुणांनी चरण प्रीमियर लीग सुरू केली आहे. गेल्यावर्षी मैदानात अनेक जुन्या खेळाडूंनी आपला खेळ दाखवला. यावर्षी ही क्रिकेट (Cricket) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजकांनी प्रथम पारितोषिक 11 हजार 111 रुपये चषक आणि मानाचा एक बोकड ठेवला आहे. तर, द्वितीय बक्षीस 7 हजार 777 रुपये आणि चषक त्याचबरोबर पाच कोंबडे बक्षीस (Award) ठेवले आहे. तर, तृतीय बक्षिसाचे स्वरूप 5 हजार 555 रुपये चषक आणि 5 कोंबड्या असे आहे.

चर्चा तर होणारच! क्रिकेट स्पर्धेत बक्षीस म्हणून मानाचा बोकड आणि कोंबडा-कोंबडी
महागाईच्या निषेधार्थ, मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसचे भोंगा आंदोलन

या स्पर्धेत साखळी पद्धतीने सामने खेळविले जातील. स्पर्धेची तारीख जाहीर झाल्यापासून पुन्हा क्रिकेटची चर्चा सुरू झाली आहे. ही स्पर्धा घेण्यासाठी गावातील अनेक तरुण मुंबई-पुणे होऊन गावी परत येत आहे. गेल्या वर्षी अंतिम टप्प्यातील सामने अधिक रोमांचक झाले होते. त्यामुळे अनेक जण यंदाच्या चरण प्रीमियर लीगची वाट पाहत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.